बेस्ट संप : राज ठाकरेंच्या एंट्रीनंतर आता उद्धव ठाकरेही अॅक्शनमध्ये

विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी करत असलेल्या या संपावर तोडगा काढण्यासाठी खलबतं सुरू आहेत. उद्धव ठाकरेंसह पालिका आयुक्त अजोय मेहता हेदेखील या चर्चेत सहभागी झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jan 10, 2019 04:25 PM IST

बेस्ट संप : राज ठाकरेंच्या एंट्रीनंतर आता उद्धव ठाकरेही अॅक्शनमध्ये

मुंबई, 10 जानेवारी : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी महापौर बंगल्यावर चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महापौर बंगल्यावर दाखल झाले आहेत.

विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी करत असलेल्या या संपावर तोडगा काढण्यासाठी खलबतं सुरू आहेत. उद्धव ठाकरेंसह पालिका आयुक्त अजोय मेहता हेदेखील या चर्चेत सहभागी झाले आहेत. या बैठकीत संपावर तोडगा निघतो का, हे पाहावं लागेल.

संपकऱ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

गेल्या तीन दिवसांपासून बेस्टचे कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. आज तिसऱ्या दिवशी त्यांनी राज ठाकरेंकडे त्यांची व्यथा मांडली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहचलं. यावेळी बेस्ट कर्मचारी आणि त्यांच्या पत्नीदेखील राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्या होत्या. राज ठाकरेंनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांनी आता राज ठाकरे यांच्याकडे त्यांच्या मागण्या मांडल्या आहेत.

मनसेने बेस्टच्या संपाला पाठिंबा दिला आहे. यावेळी 'संप मिटवण्यासाठी बेस्ट स्थानकात आरती करावी' अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केली होती. तसंच पालिका आयुक्तांना बेस्ट बस एमएमआरडीएच्या घशात घालायची आहे आणि याला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचा आरोप मनसेनं केला होता.

Loading...

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईमध्ये बेस्ट बंद आहेत. बुधवारी दिवसभर कामगार संघटना आणि प्रशासनामध्ये बेस्ट कर्चमाऱ्यांच्या मागण्यांबाबत बैठका होत राहिल्या मात्र त्यात काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशीदेखील मुंबईच्या रस्त्यांवर बेस्ट बस धावणार नाहीत.


'मित्रों...' भुजबळांकडून मोदींच्या मिमिक्रीनंतर तुफान हशा, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2019 04:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...