उद्धव ठाकरे 'इन अ‍ॅक्शन', इन्स्टाग्रामवर 'विजयदुर्ग'च्या पडझडीची पोस्ट पाहिल्यानंतर ताबोडतोब दिले आदेश

उद्धव ठाकरे 'इन अ‍ॅक्शन', इन्स्टाग्रामवर 'विजयदुर्ग'च्या पडझडीची पोस्ट पाहिल्यानंतर ताबोडतोब दिले आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीचे वृत्त इन्स्टाग्रामवर पाहिले.

  • Share this:

मुंबई, 18 जुलै : दुर्गप्रेमी आणि छायाचित्रकाराची शोधक नजर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीचे वृत्त इन्स्टाग्रामवर पाहिले. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील भारतीय पुरातत्व खात्याला किल्ल्याच्या डागडुजी आणि देखभालीसाठी पावले उचलण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रख्यात छायाचित्रकार आहेत. त्यांनी चित्रित केलेल्या छायाचित्रांचा ‘महाराष्ट्र देशा’ हा संग्रह वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. याशिवाय त्यांचे महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांवर विशेष प्रेम आहे. छायाचित्रकार असल्यामुळे इन्स्टाग्राम या छायाचित्रांशी निगडीत समाज माध्यमावरील त्यातही गडकोट किल्ले आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांच्या घडामोडींबाबत ते सजग असतात. यातून मुख्यमंत्री ठाकरे यांना आज इन्स्टाग्रामवर विजयदुर्ग या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलदुर्गाचा एका बुरुजाची पडझड झाल्याचे लक्षात आले.

या पोस्टची तत्काळ दखल घेत, त्यांनी भारतीय पुरातत्त्व खात्याला याबाबत माहिती कळविण्याचे तसेच पडझड रोखण्यासाठी आणि या दुर्गाच्या देखभालीबाबतही केंद्राकडील या खात्याकडे पाठपुरावा करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव यांना उद्धव ठाकरेंनी सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा - मंदिरांसाठीही पॅकेज द्या, चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

इन्स्टाग्रामवर विजयदुर्गच्या पडझडीची दखल घेण्यापासून ते त्याबाबत प्रशासनाला सतर्क करून, थेट भारतीय पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा करण्याच्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या प्रय़त्नामुळे निश्चित विजयदुर्गच्या या बुरूजाची पडझड रोखणे शक्य होणार आहे. तसेच या जलदुर्गाच्या देखभालीचा मार्गही आणखी सूकर होणार आहे.

Published by: Akshay Shitole
First published: July 19, 2020, 9:32 AM IST

ताज्या बातम्या