सहा मजली इमारत, 11.60 कोटी खर्च ; असं असेल 'मातोश्री 2.0' !

सहा मजली इमारत, 11.60 कोटी खर्च ; असं असेल 'मातोश्री 2.0' !

उद्धव ठाकरेंनी नवीन मातोश्री उभारण्यासाठी ११ कोटी ६० लाख रुपये गुंतवणूक केली असल्याची माहिती मिळतेय

  • Share this:

उदय जाधव,मुंबई

30 मार्च : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत नवं घर अर्थात 'मातोश्री' उभारतायत. वांद्रे पूर्व कलानगर येथील 'मातोश्री' निवास्थानाजवळच, 'मातोश्री-२' या नव्या घराचं बांधकाम सुरू झालं आहे. ठाकरे कुटुंबियांच्या नव्या पिढीसाठी, उद्धव ठाकरेंनी या सहा मजली इमारतीचा पाया रचला आहे. महाराष्ट्रातील महत्वाचं सत्ताकेंद्र कसं असणार आहे ? याबद्दलचा एक रिपोर्ट....

मातोश्री म्हणजे लाखो शिवसैनिकांचं श्रद्धा स्थान. गेली अनेक दशकं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, यांनी याच मातोश्रीतून राज्यातलीच नव्हे तर, देशाच्या राजकारणाची सूत्र हलवली. आता ठाकरे कुटुंबाच्या नव्या पिढीसाठी मातोश्री शेजारीच नवीन मातोश्री २ चा पाया उद्धव ठाकरेंनी रचलाय. या नवीन 'मातोश्री'च्या जागेवर प्रसिद्ध चित्रकार के. के. हेब्बर यांचं निवासस्थान होतं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या तीन मुलांनी ही जागा कायदेशीररीत्या उद्धव ठाकरेंना विकली. आता याच जागेवर नवीन मातोश्री उभं राहतंय.

असं असेल 'मातोश्री 2.0'

१) एकूण १० हजार चौरस फूट जागा

२) सहा मजली इमारत

३) या इमारतीत ट्रिपलेक्स फ्लॅट असणार आहेत

४) या फ्लॅटमध्ये २ माळा उंचीचे हाॅल असणार

५) प्रत्येक फ्लॅटमध्ये ५ बेडरूम आणि स्टडी रूम

६) पुस्तक लायब्ररी आणि फोटो लायब्ररी असणार

७) कारसाठी विशेष पार्किंगची वेवस्था

८) राजकीय खलबतं करण्यासाठी ४ एंट्री चेंबर

९) येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास मोठं स्वयंपाक घर

१०) सुरक्षा यंत्रणांचीही खास व्यवस्था करण्यात आली

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरेंनी नवीन मातोश्री उभारण्यासाठी ११ कोटी ६० लाख रुपये गुंतवणूक केली असल्याची माहिती मिळतेय. नवीन मातोश्रीचं डिझाईन वास्तूविशारद तलाटी अँन्ड पानथकी यांनी केलं आहे. भविष्यातील शिवसेनेची रणनीती आता या नवीन 'मातोश्री'मधून होणार हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2017 05:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading