मुंबई, 14 जून : महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Goverment) मुख्यमंत्रिपदावरून पडद्याआड सुरू असलेली चर्चा आता समोर येत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) हेच पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील जर राष्ट्रवादीने (NCP) मुख्यमंत्रिपदाची भूमिका घेतली तर काँग्रेस योग्य भूमिका घेईल, असं महत्त्वाची विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं आहे.
मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच पाच वर्ष राहणार असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थनं केलं आहे.
संजय राऊत यांनी सांगितले आहे की, शिवसेनेचा मुख्यमंत्री 5 वर्ष राहणार आहे. आमच्यात सर्व चर्चा झाली होती. त्यामुळे आमचं संजय राऊत भूमिका समर्थन आहे, पाच वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, त्यांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असेल. जर राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद हवं असेल तर त्यावेळेस काँग्रेस पक्ष भूमिका घेईल, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.
हापुस नाही तर हा आहे जगातील सर्वात महागडा आंबा; किंमत ऐकून चक्रावून जाल
तसंच, 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस हा मोठा पक्ष ठरणार आहे. जनतेनं आम्हाला जास्त जागा दिल्या तर आमचे पक्ष श्रेष्ठ निर्णय घेतली कुणाला मुख्यमंत्री करायचे.आता तरी महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे हेच पाच वर्ष मुख्यमंत्री असणार आहे, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट करत आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगितलं.
काँग्रेस पुढील स्थानिक स्वराज्य निवडणूक स्वबळ लढवणार ही आमची भूमिका आहे. कार्यकर्त्यांचीही तशी इच्छा आहे. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेत आहोत, असंही पटोले म्हणाले.
भयंकर! नरभक्षक व्यक्तीच्या फ्लॅटमधून हजारो मानवी हाडे जप्त
शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर फटका काँग्रेस बसेल का यावर नाना पटोले म्हणाले की, जर ते दोन्ही पक्ष एकत्र आले तर पंढरपूर विधानसभा निवडणूक काय झाले हे लोकांनी बघितले. त्यामुळे काँग्रेसला असा काही फरक पडणार नाही' असंही पटोले म्हणाले.
हिंदू म्हणून राम मंदिर मदत केली होती. पैसे गोळा केले होते. लोकांच्या घराघरात जाऊन पैसे मागितले होते. ट्र्स्ट करत असेल तर ऑडिट मुद्दा काढला होता. पण आता या गैरव्यवहार पाहिला तर श्री राम नाव जपना, पराया माल अपना' अशी खोचक टीकाही पटोलेंनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.