S M L

विधान परिषदेत शिवसेनेचे गटनेते बदलणार; नाराज आमदारांना खूश करण्याचा प्रयत्न?

मातोश्रीवर आज (गुरूवारी) होणाऱ्या बैठकीत शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांचा, गेल्या दोन वर्षातील कार्य अहवाल तपासला जाणार आहे.

Samruddha Bhambure | Updated On: Apr 6, 2017 09:43 AM IST

विधान परिषदेत शिवसेनेचे गटनेते बदलणार;  नाराज आमदारांना खूश करण्याचा प्रयत्न?

उदय जाधव, मुंबई

06 एप्रिल : शिवसेनेत येत्या काही दिवसांत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे सदस्य असलेल्या मंत्र्यांची मंत्रीपदं जाण्याची चर्चा सध्या शिवसेनेच्या गोटात आहे. गुरूवारी मातोश्रीवर बोलावलेल्या विशेष बैठकीत उद्धव ठाकरे सर्व मंत्र्यांचा कार्य अहवाल तपासणार आहेत. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या फेरबदलाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यात नाराज आमदारांना मंत्रिपदं मिळतील असंही म्हटलं जातंय.

मातोश्रीवर आज (गुरूवारी) शिवसेनेची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांचा, गेल्या दोन वर्षातील कार्य अहवाल तपासला जाणार आहे. यावेळी महाराष्ट्रात झालेल्या वेगवेगळ्या निवडणुकांत, मंत्र्यांनी काय कामगिरी केली. याचाही आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर खराब कामगिरी असलेल्या मंत्र्यांवर पक्ष बळकट करण्याची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर चांगली कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना प्रमोशन दिलं जाणार असल्याचीही माहिती मिळतेय. आता आपण नजर टाकूयात शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामगिरीवर शिवसेनेच्या मंत्र्यांचं प्रगती पुस्तक

एकनाथ शिंदे (एमएसआरडीसी मंत्री )

- आमदारांची नाराजी नाही

Loading...

- निवडणुकीत चांगली कामगिरी

- प्रमोशन मिळण्याची शक्यता

सुभाष देसाई (उद्योग मंत्री)

- आमदारांची सर्वाधिक नाराजी

- निवडणुकीत खराब कामगिरी

- मंत्रिपद जाण्याची शक्यता

दिवाकर रावते (परिवहन मंत्री )

- आमदारांची सर्वाधिक नाराजी

- निवडणुकीत खराब कामगिरी

- मंत्रिपद जाण्याची शक्यता

रामदास कदम (पर्यावरण मंत्री)

- आमदारांची नाराजी नाही

- निवडणुकीत जेमतेम कामगिरी

- मंत्रिपद जाऊ शकतं

डॉ. दीपक सावंत (आरोग्यमंत्री )

- आमदारांची नाराजी

- निवडणुकीत काहीच कामगिरी नाही

- मंत्रिपद जाऊ शकतं

संजय राठोड (महसूल राज्यमंत्री )

- निवडणुकीत चांगली कामगिरी

- कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळण्याची शक्यता

गुलाबराव पाटील (सहकार राज्यमंत्री )

- निवडणुकीत चांगली कामगिरी

- कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळण्याची शक्यता

एक नजर टाकूयात शिवसेनेतल्या कोणत्या आमदारांना मंत्रिपदं मिळू शकतात, त्या चर्चेतल्या नावावर...

मंत्रिपदासाठी सेनेची चर्चेतली नावं

१) विजय औटी

२) शंभुराजे देसाई

३) अनिल कदम

४) राजेश क्षीरसागर

५) प्रताप सरनाईक

एकत्र सत्तेत असूनही शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचंड तणाव आहे. हा तणाव निवळण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकार घेणार असल्याचीही माहिती मिळतेय. भाजपकडून शिवसेनेला आणखी दोन मंत्रिपदं दिली जातील अशी सूत्रांची माहिती आहे. तसंच अयशस्वी मंत्र्यांना दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात. याकडंही सर्वाचं लक्ष लागलंय. तर शिवसेनेतील ज्येष्ठ मंत्र्यांच्या डोक्यावर, राजीनाम्याची टांगती तलवार मंत्रिमंडळ फेरबदलापर्यंत कायम असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2017 09:43 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close