सहा महिन्यांच्या आत ठाकरे सरकार कोसळणार, भाजपच्या नेत्याने केला दावा

सहा महिन्यांच्या आत ठाकरे सरकार कोसळणार, भाजपच्या नेत्याने केला दावा

'नवं सरकार फक्त आढावा घेण्याच्या मागे आहेत. 13 दिवस झाल्यानंतरही त्यांनी साधं खात्यांचं वाटप केलेलं नाही. त्यातच अनेक योजना बंद करण्यात येत आहेत. असं कामकाज फार काळ चालणार नाही.'

  • Share this:

मुंबई 10 डिसेंबर : महाराष्ट्रातल्या सत्ता नाट्याला आता महिना उलटून गेला तरी त्याचे पडसाद अजुनही उमटत आहेत. भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सगळे एकत्र आले आणि महाविकास आघाडी स्थापन केली. या प्रयोगाची देशभर चर्चा झाली. महाराष्ट्रात नवं सरकार येवून आता 13 दिवस झाले असले तरी सत्ता स्थापनेसाठी पडद्यामागे काय झाले याचे अनेक खुलासे होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकांमागून बैठका घेत अनेक विभागांचा आढावा घ्यायला सुरुवात केलीय. हे तीन पक्षांचं सरकार असल्याने त्याच्या भवितव्याबद्दल कायम शंका व्यक्त केली जातेय. असं वातावरण असताना भाजपचे नेते गिरीश व्यास यांनी एक मोठा दावा केलाय. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडालीय.

एकनाथ खडसेंना भेटणारच, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने भाजपची चिंता वाढली

गिरीश व्यास म्हणाले, नवं सरकार फक्त आढावा घेण्याच्या मागे आहेत. 13 दिवस झाल्यानंतरही त्यांनी साधं खात्यांचं वाटप केलेलं नाही. त्यातच अनेक योजना बंद करण्यात येत आहेत. असं कामकाज फार काळ चालणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार सहा महिन्याच्या आत कोसळणार असून मे- जून महिन्यात सरकार गडगडेल असं भाकितही त्यांनी केलं.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चांगलं खातं मिळण्यावरून मतभेद झाल्याने खातेवाटप रखडल्याचं बोललं जातंय. त्यावरून बैठकांना सुरुवातही झालीय. मात्र नागपूर अधिवेशनानंतर खाते वाटप आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यताही व्यक्त केलीय जातेय.

'भारताचा प्रवास 'मेक इन इंडिया' पासून 'रेप इन इंडिया'पर्यंत'

उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुलाखती देत अनेक गोष्टी सांगितल्या. जेवढ्या गोष्टी गरजेच्या आहेत तेवढ्याच आत्ता सांगणार आहे. काही गोष्टी उजेडात आलेल्या नाहीत. त्या योग्य वेळी बाहेर आणणार आहे असंही फडणवीसांनी सांगितलं होतं. त्यावरून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. शिवसेना काँग्रेससोबत कशी गेली हे आश्चर्यजनक आहे असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ते माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांच्याकडे माझी बरीच माहिती असेल. त्यांना काय बोलायचं आहे ते बोलू द्या.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 10, 2019, 6:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading