फडणवीसांना ठाकरे सरकारचा पुन्हा दणका, 'हा' निर्णय घेत दिला धोबीपछाड

फडणवीसांना ठाकरे सरकारचा पुन्हा दणका, 'हा' निर्णय घेत दिला धोबीपछाड

सत्ताबदल झाल्यानंतर एकमेकांना शह देण्याचं राजकारण नेहमीच होतं. अशातच ठाकरे सरकारने आणखी एक निर्णय घेत फडणवीसांवर कुरघोडी केली आहे.

  • Share this:

नागपूर, 02 जून : सत्तापालट झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची चांगल्या पदांवर नेमणूक करतात. तसंच आधीच्या सरकारने केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचाही सपाटा लावला जातो. ठाकरे सरकारनेही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारने केलेल्या नियुक्त्या रद्द करत भाजपला शह दिला आहे.

गलेलठ्ठ पगार देऊन महापारेषण कंपनीत मागच्या दाराने अनाधिकृतपणे नियुक्त केलेल्या मर्जीतील सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या करार पद्धतीवरील नियुक्त्या उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी रद्द केल्या असून या बाबतचे आदेश 1 जून 2020 रोज़ी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महापारेषण यांनी निर्गमीत केले आहे, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

अशा प्रकारे नियमबाह्य पद्धतीने महावितरण, महानिर्मिती,महाऊर्जा व सूत्रधारी कंपनीत मागील दाराने नियुक्त करण्यात आलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुद्धा रद्द करण्यात येत आहेत. सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्याबाबत ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई तातडीने करण्याचे आदेश राऊत यांनी या सर्व कंपन्यांना दिले होते. त्यानुसार आज महापारेषण कंपनीद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे.

ऊर्जामंत्री यांच्या आदेशानुसार या नियुक्त्यांचा आढावा घेण्यात आल्यानंतर सदर नियुक्त्यांमुळे कंपनीच्या कामात कोणतीच सुधारणा झाल्याचे आढळून आले नाही. तसेच या निवृत्त अधिकाऱ्यांना गलेलठ्ठ पगार देऊन नियुक्त्या दिल्याने कंपनीवर आर्थिक बोजा वाढला होता. मर्जीतील अधिकाऱ्याच्या ऋणाची परतफेड करण्यासाठी नियुक्त्या दिल्या अशी या कंपनीतील कामगार वर्गामध्ये चर्चा सुरू होती.

First published: June 2, 2020, 8:37 AM IST

ताज्या बातम्या