Home /News /mumbai /

देवेंद्र फडणवीसांना आणखी एक धक्का, ठाकरे सरकारने बंद केली महत्त्वाची योजना

देवेंद्र फडणवीसांना आणखी एक धक्का, ठाकरे सरकारने बंद केली महत्त्वाची योजना

काँग्रेसचा या योजनेला विरोध होता. त्यामुळेच काँग्रेसची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचीही चर्चा आहे.

    मुंबई 31 जुलै: राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणखी एक महत्त्वाची योजना बंद केली आहे. आणीबाणीच्या काळात ज्यांनी तुरुंगवास भोगला अशा कार्यकर्त्यांना फडणवीस यांनी पेंशन देण्याचा निर्णय घेतला होता. कोविडमुळे राज्यात आर्थिक संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे ही योजना बंद करत असल्याचं सरकारने म्हटलं आहे. हा निर्णय भाजपच्या वैचारिक तत्वांना पुढे ठेवून निर्णय घेतला होता. ठाकरे सरकारने तोच निर्णय फिरवल्याने हा भाजप आणि देवेंद्र फडणवीसांसाठी धक्का मानला जातोय. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादण्याच्या निर्णयाविरोधात भाजपसह त्यावेळीच्या अनेक नेत्यांनी सहभाग घेत आंदोलन केलं होतं. आणीबाणी ही लोकशाहीची हत्या होती असा आरोप करत भाजप अजुनही काँग्रेसला टार्गेट करत असते. त्यामुळे काँग्रेसचा या योजनेला विरोध होता. त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या आधीही ठाकरे सरकारने फडणवीसांच्या काळात घेतलेले अनेक निर्णय फिरवले होते. सत्तेत आल्यानंतर काही दिवसांनीच काँग्रेसच्या मंत्र्यांनी या योजनेला विरोध केला होता. त्यामुळे या योजनेचं भवितव्य अधांतरीच होतं. कोरोना रुग्णांसाठी Good News, फक्त 0.28 टक्के पेशंटलाच व्हेंटिलेटर्सची गरज आणीबाणी ही लोकशाहीतला काळा अध्याय आहे. त्यामुळे त्याविरुद्ध लढणारेही स्वातंत्र्य सैनिकच आहेत असा युक्तिवाद त्यावेळी भाजपने केला होता. आणीबाणी विरोधात जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, समाजावादी विचारसरणीचे नेते अशा सगळ्यांनी एकत्र येत लढा उभारला होता. बापरे! कानातही लपून बसू शकतो कोरोना व्हायरस, Johns Hopkinsचा धक्कादायक निष्कर्ष यावरून आता भाजप शिवसेनेला टार्गेट करण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या सांगण्यावरून शिवसेनेने हा निर्णय घेतला अशीही टीकाही करण्यात येत आहे. आपल्याला विचारून निर्णय घेतले जात नाही असं काँग्रेसचं म्हणणं होतं. त्यामुळे काँग्रेसचे नेते नाराजही होते. ती नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Uddhav thackeray

    पुढील बातम्या