गुजरातमधील वातावरण आणि एक्झिट पोलचे अंदाज न पटणारे -उद्धव ठाकरे

एक्झिट पोलचे अंदाज फारसे पटले नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 16, 2017 06:06 PM IST

गुजरातमधील वातावरण आणि एक्झिट पोलचे अंदाज न पटणारे -उद्धव ठाकरे

16 डिसेंबर : एक्झिट पोलचे निष्कर्ष आणि आतापर्यंतचं वातावरण याचा कुठेच ताळमेळ न बसणार आहे असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक्झिट पोलवर संशय व्यक्त केलाय.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर वृत्तवाहिन्यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवलाय. मात्र, एक्झिट पोलचे अंदाज फारसे पटले नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मातोश्री निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते बोलत होते.

जो निकाल लागायचा तो लागेलच आणि तो सोमवारी कळेलच  आणि तो आपल्याला मान्यही करावा लागेल परंतु, मध्यंतरी ईव्हीएम मशीनवर आरोप केला गेला होतो. ते आणि आधीच चित्र याचं ताळमेळ पुन्हा बसवावं लागेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

काँग्रेसचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचंही उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आणि आणि शुभेच्छाही दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2017 06:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...