राज्यात अविश्वसनीय करून दाखवणार, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

राज्यात अविश्वसनीय करून दाखवणार, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपालांनी केली आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांची लीलावती रुग्णालयात उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली.

  • Share this:

मुंबई, 12 नोव्हेंबर : राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर त्यांना पाठिंब्याचे पत्र न मिळाल्याने दावा करता आला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अखेरपर्यंत पाठिंबा देणारे पत्र शिवसेनेला मिळू शकले नाही. त्यानतंर शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन काही वेळ मागून घेतला. पण राज्यपालांनी त्यासाठी नकार दर्शवला आणि नियमानुसार तिसरा मोठा पक्ष असेलल्या राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी बोलावलं आहे. या काळात शिवसेनेचे खासदार संजय राऊत जे निकालापासून सातत्याने पक्षाची भूमिका मांडत होते त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची लीलावती रुग्णालयात भेट घेतली.

संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना अविश्वसनीय अशी गोष्ट करून दाखवणार अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपला 72 तास दिले मात्र सेनेला फक्त 48 तास दिले. त्याच संदर्भात त्यांनी राज्यपालांनी आपल्याला कमी वेळ दिल्याची खंतही उद्धव ठाकरे यांनी केली.

विधानसभेचा निकाल लागल्यानंतर भाजपला 50-50 फॉर्म्युल्याची आठवण करून देणारे आणि सातत्याने पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडणारे संजय राऊत यांना सोमवारी छातीत दुखू लागल्याने लीलावती रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं. त्याठिकाणी सायंकाळी त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यामध्ये दोन ब्लॉकेजेस असल्याचं निदान झाल्यानंतर अँन्जिओप्लास्टीही केली गेली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच राऊत यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे समजले नाही. दुसरीकडे काँग्रेसचे दिल्लीतील नेते राज्यात येऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत. आज संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादीला राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करावा लागणार आहे.

सध्या काँग्रेसचे आमदार जयपूरमध्ये आहेत. वरिष्ठ नेते दिल्लीत असल्यानं चर्चेत अडचणी येत असल्याचं अजित पवार म्हणाले. आम्ही एकटे काही करू शकत नाही. उद्या सरकार स्थापन करायचं असेल तर काँग्रेससोबत चर्चा केल्याशिवाय आम्हाला कोणताही निर्णय़ घेता येत नाही असंही अजित पवार यांनी सांगितलं. तसंच राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी सबूरीनं घ्या असंही अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता शिवसेना-राष्ट्रवादी सरकार स्थापन करून काँग्रेस पाठिंबा देईल का याची चर्चा रंगली आहे.

VIDEO : शरद पवारांच्या विधानामुळे गोंधळात वाढ, काँग्रेससोबत बैठकीवर दिलं धक्कादायक उत्तर

वेळेअभावी बैठक कोणत्या ठिकाणी घ्यायची हेदेखील महत्त्वाचे आहे. सध्या दिल्लीत ही बैठक घेणं शक्य नाही. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ कमी आहे. त्या वेळेत दिल्लीत जाऊन चर्चा करणं आणि पुन्हा इथं येऊन पुढची वाटचाल करणं कठिण असल्याचं अजित पवार म्हणाले.

भाजपने सत्ता स्थापनेस असमर्थता दर्शवल्यानंतर आता शिवसेनेच्या हातात सत्तेची दोरी आहे असं वाटत असतानाच चक्र फिरली आणि राज्याच्या राजकाराणाला अर्ध्या तासात ट्विस्ट मिळाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या निर्णयावर आता महाराष्ट्राचं भवितव्य अवलंबून आहे.

काँग्रेसच्या निर्णयानंतरच निर्णय घेणार अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती. शिवसेनेबरोबर जाण्यास सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका वाड्रा अनुकूल नसल्याची सूत्रांची माहिती आहे.त्यामुळेच पाठिंब्याचं पत्र वेळेत मिळालं नाही. राष्ट्रवादीशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं काँग्रेसने कळवलं.

अभूतपूर्व! राज्यपालांचं राष्ट्रवादीला निमंत्रण; आता उरल्यात 2 शक्यता

वाचा : अर्ध्या तासांत कसं बदललं सत्तास्थापनेचं चित्र, राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल?

VIDEO : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल का? घटनातज्ज्ञ म्हणतात...

Published by: Manoj Khandekar
First published: November 12, 2019, 1:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading