Live ज्यांना टक्कर देण्याची खुमखुमी असेल त्यांना जागा दाखवून देणार, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात

Live ज्यांना टक्कर देण्याची खुमखुमी असेल त्यांना जागा दाखवून देणार, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात

'आम्ही गुळाला मुंगळा कसा चिटकतो तसे नाही. दसरा मेळावा टार्गेट करायला नाही. पाठीत वार केलात तर कोथळा काढणार.'

  • Share this:

मुंबई 25 ऑक्टोबर: शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार घणाघात केला. ज्यांना आमच्याशी टक्कर द्यायची खुमखुमी असेल त्यांनी अंगावर यावं आम्ही त्यांना दाखवून देऊ असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपचं नाव न घेता दिलं. हिंदुत्वाची व्याख्या आम्हाला सांगणाऱ्यांनी मोहन भागवत यांनी दिलेलं भाषण ऐकावं असंही त्यांनी भाजपला सुनावलं.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आम्ही गुळाला मुंगळा कसा चिटकतो तसे नाही.  दसरा मेळावा टार्गेट करायला नाही. कोरोनाची लस बिहारला मोफत देणार पण काहीना येथे मोफत लस देण्याची गरज असते.  आज मी मास्क बाहेर काढून बोलणार, सीएम म्हणून नाही. त्यामुळे कदाचित संयम सुटला तर समजून घ्या. ज्यांना टक्कर देण्साची खुमखुमी असेल त्यांनी टक्कर द्यावी त्यांना दाखवून देऊ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

जीएसटी थकीत रक्कम देत नसाल केंद्र सरकारची ही कर पद्धत फसली आहे, पीएम यांनी त्यात प्रामाणिकपणे सुधारणा करा, अथवा आधीच्या मूळ कर प्रणालीयावर जावे. हा देश कोणा एकाची मक्तेदारी होती...जी मस्ती इंग्रजांना सत्ता सूर्य मावळत नाही ती मस्ती भाजपात असेल तर ती मस्ती उतरवली पाहिजे.

महाराष्ट्रात जो डाव खेळला गेला तोच आता बिहारमध्ये खेळला जात आहे असा आरोपही त्यांनी केला.

आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?

सरसंघचालक यांनी सांगितलेले हिंदुत्व मानता की नाही? सरसंघचालक सांगतात हिंदुत्व हे पूजेपर्यंत मर्यादित हिंदुत्व नाही, मंदिर उघडे करा म्हणतात. टोप्या नका घालू विनाकारण काहीही सांगून असा निशाणाही त्यांनी भाजपला लगावला.

आपल्या संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपला टार्गेट केलं. कंगणा राणौतवरही त्यांनी जोरदार टीका केली. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हे पंतप्रधान मोदींचा अपमान आहे असंही ते म्हणाले.

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्रावर, शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबीयांवर जे आरोप केले ते महाराष्ट्राला बदनाम करणारं आहे. शेण खाऊन त्यांनी आमच्यावर गोमुत्राच्या गुळण्या केल्या ते सगळ्या जगाने पाहिलं असंही ते म्हणाले.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 25, 2020, 7:37 PM IST

ताज्या बातम्या