मुंबई, 08 ऑक्टोबर : मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा विराट असा दसरा मेळावा पार पडला. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा पुर्नउच्चार केला. तसंच भाजपसोबत युती का केली याचा खुलासाही केला आणि ऊतू नका मातू नका, घेतला वसा मोडू नका असं सांगत इशाराही दिला.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
- ऊतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका, उद्धव ठाकरेंचा
- डोक्यात जर सत्ता घुसली तर रस्त्यावरचा कुत्राही विचारणार ही नाही
- युतीमुळे ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांची मी माफी मागतो
- नोकऱ्या दिल्या नाहीत तर युवाशक्तीचा बॉम्ब होईल
- 10 रुपये प्लेट जेवण देणारी योजना आणणार
- 1 रुपयामध्ये आरोग्य चाचणी
- सत्तेत आल्यावर संपूर्ण कर्जमाफी करणार
- अमित शहा जे बोलतात ते करून दाखवतात, अमित भाई समान नागरी कायदा आणाच
- कलम 370 हटवणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं
- शिवसेनेला कुणीही वाकवू शकत नाही
- सूडाचं राजकारण करणाऱ्यांना चिरडून टाकू
- शिवसेनाप्रमुखांना अटक करण्याच्या अफवा पसरवल्या गेल्या, शाळा बंद, कॉलेज बंद पडली होती.
- 2000 साली शिवसेनाप्रमुखांवर कोणता गुन्हा दाखल केला होता?
- अजित पवारांच्या डोळ्यात पाणी, हे तुमच्या कर्मानं तुमच्या डोळ्यात पाणी
- दिलेलं वचन मोडू नका, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला
- आमच्या देशावर प्रेम करणारे मुसलमान आमच्या सोबत आले, तर आम्ही त्यांचे सुद्धा न्यायहक्क मिळवून देऊ
- आजही आम्ही ठाम आहोत, विशेष कायदा करा आणि अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधा ही आजही शिवसेनेची मागणी आहे
- सत्तेसाठी राम मंदिर नको - उद्धव ठाकरे
गरीबांना 10 रुपयांमध्ये थाळी देणार
पुन्हा सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहोत. नवं सरकार आल्यानंतर गरीबांना 10 रुपयांमध्ये थाळी देणार आहोत. 300 युनिटपर्यंतच्या वीजेचा भाव 30 टक्के कमी करू. 1 रुपयांमध्ये आरोग्याची चाचणीची सुविधा देऊ असं आश्वासनही त्यांनी दिलं. फक्त निवडणुकांसाठी आश्वासन नाही तर लोकांशी कायम प्रमाणीक राहिलं पाहिजे असंही ते म्हणाले.
===================================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा