...तर अजित पवारांनी भाजपप्रवेश करायला हवा होता - उद्धव ठाकरे

...तर अजित पवारांनी भाजपप्रवेश करायला हवा होता - उद्धव ठाकरे

पूर्वी दसरा–दिवाळीस रवा, साखर, तेलासाठी रेशनिंगच्या दुकानात रांगा लागायच्या तशा रांगा भाजप, शिवसेनेच्या बाहेर लागल्या आहेत. महाराष्ट्रात पक्षांतराचे रेशनिंग सुरू आहे, पण रेशनिंग दुकानात पूर्वी व्हायचा तसा काळाबाजार येथे नाही. - उद्धव ठाकरे

  • Share this:

मुंबई, 29 जुलै :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपनं लोकसभा निवडणूक 2019मध्ये घवघवीत यश मिळवलं. भाजपचं यश पाहता आपली राजकीय कारर्कीद टिकवून ठेवण्यासाठी धास्तावलेल्या विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपची वाट धरण्यात सुरुवात केली. यानुसार देशभरात भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही शिवसेना-भाजपत राष्ट्रवादी-काँग्रेसमधून जोरदार  इनकमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सणसणीत टोला हाणला आहे.

'पूर्वी दसरा–दिवाळीस रवा, साखर, तेलासाठी रेशनिंगच्या दुकानात रांगा लागायच्या तशा रांगा भाजप, शिवसेनेच्या बाहेर लागल्या आहेत. महाराष्ट्रात पक्षांतराचे रेशनिंग सुरू आहे, पण रेशनिंग दुकानात पूर्वी व्हायचा तसा काळाबाजार येथे नाही. राजकारणात फोडा, झोडा व राज्य करा या ब्रिटिश नीतीचा अवलंब जिल्हा परिषदांपासून ते राज्याच्या विधानसभा, लोकसभेपर्यंत अवलंबणारे काँग्रेसवालेच होते. शिवसेना–भाजपसही या ‘अच्छे दिना’ची कोवळी किरणे आता मिळत असतील तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने घामाघूम होण्याचे कारण नाही',अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले आहे. तसंच

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे राज्य पुन्हा यावे ही तर श्रींचीच इच्छा आहे,असं म्हणत उद्धव यांनी युतीबाबतचा सूचक इशारा दिला आहे.

आहे आजचे सामना संपादकीय?

- महाराष्ट्रासह देशभरात सध्या पक्षांतराची लाट आली आहे. पक्षांतराच्या मुसळधार प्रवाहात बरेच लोक वाहून जात आहेत. लोकशाहीच्या नव्या व्याख्येत यास ‘जिवंत लोकशाही’ म्हटले जाते. या जिवंतपणाचे जरा जास्तच अजीर्ण महाराष्ट्राला झाले आहे काय? असा प्रश्न लोकांना पडू शकतो. महाराष्ट्रातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ‘घाऊक’ पक्षांतराने वाहून गेला आहे.

(वाचा : 'प्रियंका गांधीच काँग्रेस अध्यक्षपदासाठी सर्वात योग्य उमेदवार')

- काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार रांगा लावून भाजप प्रवेशासाठी उभे आहेत. यावर शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. हे राजकारण फोडाफोडीचे आहे. इन्कम टॅक्स, ‘ईडी’सारख्या एजन्सीचा वापर करून आमदार फोडले जात आहेत असा पवारांचा आरोप आहे. शिवसेनेकडे आयकर, ईडी, पोलीस या संदर्भातली कोणतीही खाती नाहीत. त्यामुळे हा आरोप शिवसेनेस लागू होत नाही.

- प्रश्न इतकाच आहे की, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे व चौकशांची तलवार डोक्यावर असलेले लोक काँग्रेस पक्षात होते व तेच भीतीपोटी पक्षांतर करीत आहेत. - मात्र असा दबाव खरोखरच असता तर अजित पवार यांनी भाजपमध्ये सगळय़ात पहिला प्रवेश करायला हवा होता.

- भाजपचे प्रांतिक अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर कोणतीही लपवाछपवी न करता आता सांगितले आहे की, भाजपमध्ये सध्या जी ‘आयाराम’ मंडळींची रीघ लागली आहे ती स्वार्थासाठी लागली आहे. पाटलांच्या या वक्तव्यामुळे कुणाला धक्का वगैरे बसण्याचे कारण नाही. सध्याच्या राजकारणातले ‘कटू’ सत्य त्यांनी कोल्हापुरी ठसक्यात सांगितले आहे.

(पाहा :पराभवाच्या भीतीमुळे प्रणिती शिंदे बदलणार मतदारसंघ? पाहा SPECIAL REPORT)

- गेल्या पाचेक वर्षांत भारतीय जनता पक्षात ‘इनकमिंग’ वाढले आहे ते काही विचार किंवा तत्त्वे पटत आहेत म्हणून नाही. सत्तेचे लोहचुंबक व राजकीय सोय हेच त्यामागचे कारण आहे. जिथे सत्तेच्या गुळाची ढेप तेथे मुंगळे जाणार व ढेपेस चिकटून बसणारच हा राजकीय नियमच बनला आहे.

- गोव्यात काँग्रेसच्या दहा आमदारांनी व कर्नाटकात दहा-बारा काँग्रेस आमदारांनी असाच त्याग केल्याचे प्रकरण नुकतेच घडले. मध्य प्रदेशच्या विधानसभेत भाजपच्या दोन आमदारांनी ‘त्याग’ करून कमलनाथ यांना पाठिंबा दिला. प. बंगालातही तृणमूल काँग्रेसचे लोक भाजपमध्ये जाऊन त्याग करण्यास तयार झाले आहेत. हे समजून घेतले तर चंद्रकांत पाटील यांचे परखड वक्तव्याचे मोल समजून येईल.

- कुणाला जोरजबरदस्ती करून शिवसेनेने फरफटत आणले नाही. बुडत्या जहाजातून उंदीर, बेडूक पटापट उड्या मारतात, पण बोटीचे कप्तान व इतर महत्त्वाचे लोक सगळय़ात शेवटी धीराने बाहेर पडतात. आम्ही अशा ‘धीरा’च्या लोकांना नक्कीच घेत आहोत व त्याबद्दल राज्यातील काँग्रेस किंवा राष्ट्रवादीवाल्यांना खळखळ करायची गरज नाही. त्यांचेही पक्ष याच पद्धतीत तरारले आहेत.

(वाचा :मंत्री असूनही पंकजा मुंडेंनीच उद्योग बंद पाडले - धनंजय मुंडे)

- शिवसेनेची पंचवीस-पंचवीस वर्षे ‘वतनदारी’ केलेले लोक तुम्ही याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गुळाच्या ढेपेवर नेऊन बसवलेच ना? शिवसेनेने निवडून आणलेले आमदार, माजी मुख्यमंत्री, महापौर वगैरे लोक तुम्ही ‘तत्त्व’ आणि ‘त्याग’ वगैरे उपाध्या लावून शुद्ध करून घेतलेच ना? तेव्हा सूत्रे तुमच्याकडे होती. आज ती आमच्याकडे आहेत.

-ज्यांना शिवसेनेचा विचार पटतोय त्याने एक शिवसैनिक म्हणून अवश्य आमच्या परिवारात यावे. मनगटावर शिवबंधन बांधावे व कामास लागावे. आतापर्यंत लाखो शिवसैनिकांच्या काबाडकष्टातून शिवसेना उभी राहिली व पुढे गेली, याची जाणीव आम्हाला सदैव आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे राज्य पुन्हा यावे ही तर श्रींचीच इच्छा आहे.

युतीला धक्का बसणार? चार ते पाच आमदार संपर्कात असल्याचा राष्ट्रवादीचा दावा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 07:02 AM IST

ताज्या बातम्या