पवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का ?

News18 Lokmat | Updated On: Aug 14, 2018 08:56 AM IST

पवारांचं डोकं ठिकाण्यावर आहे का ?

मुंबई, 14 ऑगस्ट : मराठा, धनगर, कोळी या सगळ्याच समाजातील लोक आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे जनतेला जे पाहिजे ते तुम्ही देऊ शकत नसाल तर नुसता बोलघेवडेपणा काय कामाचा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे. मुंबई मराठी पत्रकारसंघाच्या वतीनं आयोजित केलेल्या आचार्य अत्रे पुरस्कार सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान पगडीवरून राजकारण करणाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का?, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता शरद पवारांवर टीकास्त्र डागलंय.

महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक यांचं कार्य खूप मोठं आहे, पण आता त्यांच्या पग़ड्यांवरून राजकारण सुरू आहे. पगड्यांवरून राजकारण करणाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? त्यांना डोक नावाचा भाग आहे का असा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, आता स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून काय बोलायचं असा प्रश्न नरेंद्र मोदींना पडला असले. त्यासाठी त्यांनी लोकांकडून केंद्र सरकारच्या योजनांच्या प्रगतीबाबत सर्व मंत्रालयांकडून माहिती मागितली आहे. पण या सगळ्यानंतर त्यांनी खरं बोलावं एवढीच काय ती अपेक्षा असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवरही निशाणा साधला आहे. पण काय बोलावा हा प्रश्न आम्हाला कधीही पडाला  नाही. कारण आम्ही नेहमी आमच्या जनतेशी संपर्कात असतो असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मार्मिक या साप्ताहिकाच्या 58 व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

मोदींकडून जनतेला नेहमी खोटी आश्वासन दिली जातात. त्या खोट्या आश्वासनांवर आम्ही प्रकाश पाडण्याचा प्रयत्न केला तर लगेच शिवसेना सत्तेत राहून नकारात्मक भूमिका घेत असल्याचं बोललं जातं. जनता नेहमी आश्वासन देणाऱ्यांनाच मतदान करत अशी खंतही यावेळी त्यांनी व्यक्त करून दाखवली.

 

VIDEO : रेल्वे काही सेकंदावर अन् मुलांच्या पुलावरून उड्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2018 08:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close