न्यायमूर्तींच्या प्रकरणात सरकारने हस्तक्षेप करू नये -उद्धव ठाकरे

न्यायमूर्तींच्या प्रकरणात सरकारने हस्तक्षेप करू नये -उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणाऱ्या न्यायमूर्तींचं समर्थन केलंय.

  • Share this:

13 जानेवारी : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणाऱ्या न्यायमूर्तींचं समर्थन केलंय. न्यायदेवतेला कुणी मुकी बहिरी करण्याचा प्रयत्त करत आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसंच सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करू नये, न्यायदेवतेला त्यांचं काम करू द्या असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी घेतलेली पत्रकार परिषद ही लोकशाहीत दुर्दैवी घटना आहे. या चारही न्यायमूर्तींच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते पण त्यांनी हे पाऊल का उचलले याचा विचार करणे गरजेचं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. लोकशाहीचा स्तंभ स्वतंत्र्यपणे उभा राहिला पाहिजे, जर याचा पाया कमजोर झाला तर लोकशाही ढासाळली जाईल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

तसंच जस्टिस लोया मृत्यू प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.  कर नाही त्याला डर कशाला,  असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

तसंच सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करू नये,न्याय व्यवस्थेला त्यांचं काम करू द्यावं असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.

First published: January 13, 2018, 5:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading