Home /News /mumbai /

असं असेल ठाकरे सरकारचं संभाव्य खातेवाटप, मंत्री आणि त्यांची खाती जाणून घ्या

असं असेल ठाकरे सरकारचं संभाव्य खातेवाटप, मंत्री आणि त्यांची खाती जाणून घ्या

Mumbai: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray waves as he arrives at Maharashtra Assembly for the floor test, in Mumbai, Saturday, Nov. 30, 2019. (Twitter/PTI Photo)   (PTI11_30_2019_000177B)

Mumbai: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray waves as he arrives at Maharashtra Assembly for the floor test, in Mumbai, Saturday, Nov. 30, 2019. (Twitter/PTI Photo) (PTI11_30_2019_000177B)

गेल्या काही दिवसांपासून रखडलेलं उद्धव ठाकरे सरकारचं खातेवाटप आज रात्री जाहीर होण्याची शक्यता आहे. यात अनेक राजकीय धक्के मिळण्याची शक्यता आहे.

    मुंबई 02 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून रखडलेलं उद्धव ठाकरे सरकारचं खातेवाटप आज रात्री जाहीर होण्याची शक्यता आहे. 2019 च्या शेवटी म्हणजे 30 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला होता. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या मात्र खातेवाटपावर एकमत होत नव्हतं. शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपल्याकडे महत्त्वाची खाती ठेवल्याचं मत काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केलं होतं. लोकांशी थेट संबंधीत असलेलं एखादं खातं आपल्याला हवं असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी आपल्या वाट्याला आलेले विभाग सोडण्यास तयार नव्हते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडे मोजकीच खाती ठेवण्याची शक्यता असून महत्त्वाची खाती ते एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत नगरविकास हे खातं सहसा मुख्यमंत्र्यांकडेच ठेवण्याचा प्रघात होता. मात्र ठाकरे यांनी हे खातं एकनाथ शिंदे यांच्याकडेच ठेवतील. तर राष्ट्रवादी गृहमंत्रालय अनिल देशमुखांकडे देत सगळ्यांनाच धक्का देण्याची शक्यता आहे. या खातेवाटपातल्या महत्त्वाच्या मंत्र्यांकडे कुठलं खातं असेल याची माहिती न्यूज18 लोकमतच्या हाती लागलीय. असं असेल उद्धव ठाकरे सरकारचं संभाव्य खातेवाटप उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) : सामान्य प्रशासन, अजित पवार (उपमुख्यमंत्री ) : अर्थ आणि नियोजन एकनाथ शिंदे - नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम सुभाष देसाई - उद्योग अनिल परब - मुख्यमंत्री कार्यालय आदित्य ठाकरे - पर्यावरण उदय सामंत - परिवहन बाळासाहेब थोरात- महसूल अमित देशमुख- शालेय शिक्षण जितेंद्र आव्हाड- गृहनिर्माण, नवाब मलिक - कामगार अनिल देशमुख- गृहमंत्रालय धनंजय मुंडे - सामाजिक न्याय जयंत पाटील- जलसंपदा राजेंद्र शिंगणे- आरोग्य दिलीप वळसे-पाटील- उत्पादन शुल्क राजेंद्र शिंगणे - आरोग्य यशोमती ठाकूर - महिला व बालकल्याण ...आणि अजित पवार भडकले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील 602 क्रमांकाचं दालन नाकारल्याची चर्चा होती. अंधश्रद्धेतूनच अजित पवार यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं गेलं. याबाबत प्रश्न विचारताच अजित पवार पत्रकार परिषदेत काहीसे भडकलेले पाहायला मिळाले. 'मी कोणतंही दालन नाकारलं नाही. मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठतेनुसार दालनाचं वाटप केलं आहे. आपण आता 21 व्या शतकात आहोत. अंधश्रद्धेतून दालन नाकारण्याचा विषय नाही. पवार कुटुंब कधीही अंधश्रद्धा मानत नाही. स्वत: शरद पवार यांनी कधीही अंधश्रद्धा मानली नाही. आम्ही त्याच प्रकारची भूमिका घेतो,' असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलंय.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Uddhav tahckeray

    पुढील बातम्या