खातेवाटपाच्या औपचारिक घोषणेआधीच यादी समोर; आदित्यना मिळणार आवडतं खातं
खातेवाटपाच्या औपचारिक घोषणेआधीच यादी समोर; आदित्यना मिळणार आवडतं खातं
Mumbai: Shiv Sena President Uddhav Thackeray greets his supporters during his swearing-in ceremony as the 18th Chief Minister of Maharashtra, at Shivaji Park in Mumbai, Thursday, Nov. 28, 2019. (PTI Photo/Mitesh Bhuvad) (PTI11_28_2019_000190B)
राष्ट्रवादीने गृहमंत्रालय अनिल देशमुखांकडे देत सगळ्यांनाच धक्का दिला आहे. तर आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण खाते देण्यात येण्याची शक्यता आहे.
मुंबई 04 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून रखडलेलं उद्धव ठाकरे सरकारचं खातेवाटप काही क्षणात जाहीर होणार आहे. खातेवाटपाची औपचारिक घोषणा बाकी आहे. परंतु, त्याआधी खातेवाटपाबाबतची यादी समोर आली आहे. राष्ट्रवादीने गृह खाते हे अनिल देशमुखांकडे देत सगळ्यांनाच धक्का दिला आहे. तर पर्यावरण खाते हे आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
2019 च्या शेवटी म्हणजे 30 डिसेंबरला जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या मात्र खातेवाटपावर एकमत होत नव्हतं. शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपल्याकडे महत्त्वाची खाती ठेवल्याचं मत काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केलं होतं. अखेर या खातेवाटपामध्ये राष्ट्रवादीने गृह खाते हे अनिल देशमुखांकडे देत सगळ्यांनाच धक्का दिला आहे. तर पर्यावरण खाते हे आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.
शिवसेनेनं आपल्याकडील महत्त्वाच्या नेत्यांना महत्त्वाची खाती दिली आहे. पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झालेले आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार खाते देण्यात येणार आहे. तर सेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आधी गृह खाते होते, आता त्यांच्याकडे नगरविकास आणि एमएसआरडीसी खाते देण्यात येणार आहे. तर सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग खाते कायम ठेवण्यात आलं आहे. तसंच शंकरराव गडाख यांच्याकडे जलसंधारण आणि संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी, फलोत्पादन खाते सोपवण्यात आले आहे. राजीनाम्याचा इशारा देणारे अब्दुल सत्तार यांच्याकडे महसूल आणि ग्रामविकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या अर्थात अर्थ खाते सोपवण्यात आले आहे. जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अनिल देशमुख यांच्याकडे गृह खाते सोपवण्यात आले आहे. अनिल देशमुख यांच्याकडे गृहखाते सोपवून सर्वांना एकच धक्का दिला आहे. तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा हे खाते सोपवण्यात आले आहे.
तर काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते सोपवण्यात येणार आहे. तर नितीन राऊत यांच्याकडे ऊर्जा खाते सोपवण्यात येईल. वर्षा गायकवाड यांच्याकडे शालेय शिक्षण आणि अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक विभाग देण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) : सामान्य प्रशासन, अजित पवार (उपमुख्यमंत्री ) : अर्थ आणि नियोजनशिवसेनेचे कॅबिनेट मंत्रीउद्धव ठाकरे - मुख्यमंत्री, सामान्य प्रशासन व कायदा-सुव्यवस्थाएकनाथ शिंदे - नगरविकास, एमएसआरडीसीसुभाष देसाई - उद्योगमंत्रीसंजय राठोड - वनमंत्रीशंकरराव गडाख - जलसंधारणअनिल परब - परिवहन, संसदीय कार्यउदय सामंत - उच्च व तंत्रशिक्षणआदित्य ठाकरे - पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचारदादा भुसे - कृषी मंत्रालयसंदीपान भुमरे - रोजगार हमी, फलोत्पादनराष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्रीअजित पवार - उपमुख्यमंत्री, अर्थमंत्रीअनिल देशमुख - गृहमंत्रीजयंत पाटील - जलसंपदा मंत्रीछगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठादिलीप वळसे पाटील - उत्पादन शुल्कधनंजय मुंडे - सामाजिक न्यायमंत्रीनवाब मलिक - अल्पसंख्याक मंत्रीबाळासाहेब पाटील - सहकारमंत्रीजितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण मंत्रीहसन मुश्रीफ - ग्रामविकास मंत्रीराजेश टोपे - सार्वजनिक आरोग्यराजेंद्र शिंगणे- अन्न व औषधकॉंग्रेसचे कॅबिनेट मंत्रीबाळासाहेब थोरात - महसूलमंत्रीअशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकामनितीन राऊत - ऊर्जामंत्रीवर्षा गायकवाड - शालेय शिक्षणमंत्रीके.सी. पाडवी - आदिवासी विकासमंत्रीअमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिकविजय वडेट्टीवार - मदत व पुनर्वसन, खार जमीनयशोमती ठाकूर - महिला व बालविकास मंत्रीअस्लम शेख - बंदर विकास, वस्त्रोद्योग, मत्स्य संवर्धनसुनील केदार - दुग्धविकास आणि पशुसंवर्धनराज्यमंत्रीशंभुराजे देसाई - गृहराज्यमंत्री (ग्रामीण), अर्थ, वाणिज्यसतेज पाटील - गृहराज्यमंत्री (शहर)बच्चू कडू - जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार राज्यमंत्रीराजेंद्र येड्रावकर - आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, सांस्कृतिक राज्यमंत्रीदत्तात्रय भरणे - जलसंधारण राज्यमंत्रीअदिती तटकरे - उद्योग, पर्यटन, क्रीडा राज्यमंत्रीसंजय बनसोडे - पर्यावरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्रीप्राजक्त तनपुरे - नगरविकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्रीविश्वजीत कदम - कृषी आणि सहकार राज्यमंत्रीअब्दुल सत्तार - महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.