मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /उध्दव ठाकरे येणार आंगणेवाडीच्या यात्रेला, तर भाजपचा सरकार बदलण्याचा नवस

उध्दव ठाकरे येणार आंगणेवाडीच्या यात्रेला, तर भाजपचा सरकार बदलण्याचा नवस

Pandharpur: Shiv Sena chief Uddhav Thackeray addreses a party rally at Pandharpur in Maharashtra, Monday, Dec 24, 2018. (PTI Photo) (PTI12_24_2018_000135B)

Pandharpur: Shiv Sena chief Uddhav Thackeray addreses a party rally at Pandharpur in Maharashtra, Monday, Dec 24, 2018. (PTI Photo) (PTI12_24_2018_000135B)

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी ठाकरे सरकार कोसळून लवकरच भाजप सरकार येवो असा नवसदेवीला करण्याच्या सूचना आपल्या कार्यकर्त्याना केल्या.

सिंधुदुर्ग 01 फेब्रुवारी : कोकणात सध्या भाजपाने आंगणेवाडीच्या भराडी देवीला केलेल्या नवसाची चर्चा सुरु आहे. 17 फेबृवारीला होणाऱ्या आंगणेवाडी यात्रेची तयारी आंग्णेवाडीत सुरु झालीय . या यात्रेला देवी भराडीचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे येणार आहेत. या पार्श्वभुमीवर सिंधुदुर्गातल्या भाजपा पदाधिकाऱ्यानी ,  हे सरकार जाउन लवकरात लवकर भाजपाचं सरकार येउ दे असा नवस आंगणेवाडीच्या भराडीला केलाय . विशेष म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटिल यानीच असा नवस करायाला सांगितल्याचं भाजपा पदाधिकाऱ्यानी म्हटलं आहे.

काय केला भाजपाच्या कार्यकर्त्यानी नवस 

नारायण राणे आणि नितेश राणे भाजपात आल्यावर सिंधुदुर्गात झालेल्या तीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपाला यश मिळालं. ते पाहून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल खूश झालेत. या खुशीतूनच त्यानी ठाकरे सरकार जाउन  लवकरात लवकर भाजप सरकार येवो असा नवस भराडीला करण्याच्या सूचना आपल्या कार्यकर्त्याना केल्या. त्यानुसार भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आंगणेवाडीला गेले आणि त्यानी राज्याला  लवकरात लवकर भाजपाचा मुख्यमंत्री मिळो असा नवस केलाय.

तर दुसरीकडे असा नवस केल्यामुळे आमच्या महाविकास आघाडीच्या सरकार वर त्याचा काहीही परिणाम होणार नसून आंगणेवाडीच्या भराडीचे आशिर्वाद उध्दव ठाकरेना सुध्दा असल्याचं सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यानी म्हटलय .

Budget 2020 : 'बजेट'मधल्या या आहेत 15 महत्त्वाच्या गोष्टी, जाणून घ्या

शिवसेना आणि आंगणेवाडीची यात्रा 

राजकारण्यांच्या भेटीगाठीची जत्रा म्हणून आंगणेवाडीची यात्र सुप्रसिध्द आहे. ही देवी नवसाला पावते अशी अनेकांची श्रध्दा आहे . म्हणूनच लाखो मुंबईकरांसोबतच सर्वच राजकीय नेतेही यात्रेच्या दिवशी देवी भराडीचं दर्शन घ्यायला येत असतात. पण ही जत्रा फेमस आणि गर्दीची करण्यात शिवसेना नेत्यांचा मोठा वाटा आहे. आजही आठ ते दहा लाख लोक या यात्रेला हजेरी लावतात.

खरं तर नारायण राणे मुख्यमंत्री व्हायच्या आधी बेस्टचे अध्यक्ष असल्यापासून सेना नगरसेवकाना घेउन या जत्रेला येउ लागले. त्यांच्या पाठोपाठ बीएमसीचे अनेक नगरसेवकही मग दरवर्षी या यात्रेला न चुकता येउ लागले. आंगणेवाडी राणेंच्याच मतदार संघात येत असल्यामुळे राणे  मुख्यमंत्री असताना त्यानी या भागात काही सुधारणाही केल्या.

बजेटआधीच सर्वसामान्यांना फटका! गॅस सिलिंडर 225 रुपयांनी महागले, असे आहेत नवे दर

मग जशी जशी या यात्रेची महती वाढत गेली तसे तसे सर्वच पक्षाचे नेते , खासदार , आमदार , नगरसेवक या यात्रेला हजेरी लावू लागले .आत्तापर्यंत अनेक दिग्गज नेत्यानी देवी भराडीकडे साकडं घातलय. पण शिवसेना आणि आंगणेवाडी यात्रा यांचं विशेष नातं असल्यामुळे 17 फेबृवारीचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा दौरा महत्वाचा मानला जातोय .

First published:
top videos

    Tags: Uddhav tahckeray