शिवसेना-भाजप वादानंतर बाळासाहेबांच्या भाषणाचा 'हा' VIDEO होतोय तुफान व्हायरल शिवसैनिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप बुधवारी (16 जून 2021) शिवसेना भवनासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी चोप दिल्यानंतर आज झालेली ही भेट वेगळेच संकेत देत आहेत. या भेटीने एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनी केलेल्या कृत्याचे समर्थन केल्याचं दिसून येत आहे. कुणी अंगावर आले तर शिंगावर घ्या या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी प्रमाणे शिवसैनिकांनी कृती केल्याने उद्धव ठाकरे यांनीही शिवसैनिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आहे. 'कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार' - किशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं, "मला खरंच माहिती नाहीये नेमकं काय झालं आहे? शिवसेना भवन हे आमचं श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी डिवचण्याचा कुणी प्रयत्न करणार असतील तर त्या पद्धतीने शिवसैनिक प्रत्युत्तर देणार आणि त्याचा हा भाग असेल. सत्तेत आहोत नक्कीच याची जबाबदारी आहे. पण उगाचच काही करणार असेल, कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार असंही महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.शिवसैनिक आणि शिवसेना पक्षप्रमुख... pic.twitter.com/zmyDgBFOU0
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) June 17, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Shiv sena, Uddhav thackeray