S M L

'अच्छे दिन' फक्त सरकारी जाहिरातीत, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र

राज्य सरकारची कर्जमाफी ही हातचलाखी असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केला

Sachin Salve | Updated On: Jul 23, 2017 01:27 PM IST

'अच्छे दिन' फक्त सरकारी जाहिरातीत, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र

 23 जुलै : राज्य सरकारची कर्जमाफी ही हातचलाखी असल्याचा गंभीर आरोप  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केला. तसंच अच्छे दिन फक्त सरकारी जाहिरातीत आहे देशात नाही अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'त उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसिद्ध करण्यात आलीये. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर पुन्हा हल्लाबोल केलाय.

36 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याची घोषणा सरकारनं केली आता या सर्व शेतकऱ्यांची नावं सरकारनं दयावीत अशी मागणीही त्यांनी केली. तसंच 'अच्छे दिन हे फक्त सरकारी जाहीरातीतच आलेत. देशात नाही अशी बोचरी टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली. सत्तेत राहुनही विरोधकांची आपली भूमिका कायम असल्याचं दाखवून दिलं.विशेष म्हणजे, मागच्या महिन्यात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जावून चर्चा केली होती. त्यानंतर दोनही पक्षामधला तणाव निवळेल अशी आशा होती मात्र उद्धव यांच्या आजच्या मुलाखतीनंतर तसं काही झालेलं नाही हेच स्पष्ट झालंय.

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतले महत्वाचे मुद्दे

कर्जमुक्तीत सरकारनं हातचलाखी केली असेल तर सोडणार नाही. 39 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाय ना? त्यांची यादी द्या! फसवू नका! नाही तर ढोल फोडू!

Loading...
Loading...

 खडखडाट म्हणाल तर तो थांबलेला नाही. कर्जमुक्तीची घोषणा झाल्यावर माझं खरं काम सुरू झालेलं आहे.

गटारी वर्षातून एकदाच होते. परंतु कारभार म्हणून म्हणाल तर रोजच गटारी आहे. जनतेचाच बकरा झालाय. जनतेच्याच कोंबड्या झाल्यात. रोज त्यांना कापलं जातंय.

अच्छे दिन फक्त सरकारी जाहिरातीतूनच दिसत आहेत. बाकी सगळाच आनंदीआनंद

जो कोणी पंतप्रधान असेल त्याच्याच मर्जीप्रमाणे फक्त राज्यकारभार चालवला जाणार असेल तर आपल्या देशात खरंच लोकशाही आहे काय? लोकांच्या मताला आणि म्हणण्याला काही किंमत आहे काय?

जिथं जिथं आपलं पटत नाही तिथं तिथं आपलं मत परखडपणानं मांडत राहणं हेच आमचं चाललेलं आहे.

प्रत्येक वेळेला मी जर काही बोललो तर तुम्ही ते विरोधक म्हणूनच समजणार असाल तर मग त्याला काहीच अर्थ नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 23, 2017 01:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close