'जय जवान आणि जय किसान'चे नारे देण्याचा अधिकार उरला आहे का?, शिवसेनेचा सवाल

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 3, 2017 12:52 PM IST

'जय जवान आणि जय किसान'चे नारे देण्याचा अधिकार उरला आहे का?, शिवसेनेचा सवाल

03 मे : जवानांचे बलिदान व्यर्थ चालले आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि जवान रोज शहीद होत आहेत, असे सांगत 'जय जवान आणि जय किसान'चे नारे देण्याचा अधिकार आम्हाला उरला आहे काय?,  असा खडा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.

जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमधील मेंढरमध्ये संघर्षविरामाचे उल्लंघन करत पाकिस्तानाकडून करण्यात आलेल्या गोळीबार दोन भारतीय जवान शहीद झालेत. पाकिस्तानी जवानांनी या जवानांचे शीर कापून मृतदेहाची विटंबना केल्याचे उघड झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमिवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडले आहेत.

पठाणकोट, उरी, मछली क्षेत्रातील नियंत्रण रेषेजवळील लष्करी छावणीवरील दहशतवादी हल्ल्याचे दाखल देते, हे सर्व प्रकार रोखण्यास तुमचे ते सर्जिकल स्ट्राइकही कुचकामीच ठरले, असा टोलाही उद्धव यांनी केंद्र सरकारला हाणला आहे.

त्यासोबतच,  नोटाबंदी आणि गोहत्याविरोध हा देशातील सर्वच समस्यांवरील रामबाण उपाय असल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले; पण नोटाबंदीनंतर पाकिस्तानचे हल्ले आणि देशांतर्गत दहशतवाद शतपटीने वाढला आहे. गोहत्येचे पातक नको असे ज्यांना वाटते त्यांना जवानांच्या हत्येचे पातक चालते काय?, असा घणाघातही केला आहे. गेल्या वर्षभरात कोणत्याही थेट युद्धाशिवाय हजारावर जवानांचे बळी गेले आहेत. त्या शहिदांच्या शवपेट्यांवर पुष्पचक्र वाहण्यासाठी देशात राजकीय परिवर्तन झाले आहे काय? असा संतप्त सवालही आजच्या 'सामना'त केला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2017 12:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...