• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या वनरक्षक स्वाती ढुमणेंच्या कुटुंबाला 15 लाखांची मदत, पतीला नोकरी, मुख्यमंत्र्यांची घोषणा

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या वनरक्षक स्वाती ढुमणेंच्या कुटुंबाला 15 लाखांची मदत, पतीला नोकरी, मुख्यमंत्र्यांची घोषणा

वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा मृत्यू, ताडोबातील घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय

वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा मृत्यू, ताडोबातील घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय

Maharashtra Government helps forest ranger swati Dhumane family: वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे.

  • Share this:
    मुंबई, 21 नोव्हेंबर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात (tadoba andhari tiger reserve) वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे (Forest ranger Swatti Dhumane died in tiger attack) यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांत्वन केले आहे. मृत स्वाती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे, तसेच त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक स्वाती ढुमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ओढून नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतक स्वाती ढुमणे आणि त्यांच्या कुटुंबियाप्रति संवेदना प्रकट केली आहे. वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून ढुमणे यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच स्वाती ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामवून घेण्याचेही निर्देशित केले आहे. वाचा : ताडोबात वाघाचा महिला वनरक्षकावर हल्ला; वाघाने फरफटत नेलं नंतर दाट जंगलात आढळला मृतदेह 20 नोव्हेंबर रोजी वनरक्षक स्वाती ढुमणे या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात गेल्या होत्या त्यावेळी वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात स्वाती ढुमणे यांचा मृत्यू झाला. काय घडलं नेमकं? 43 वर्षीय स्वाती ढुमणे व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात गेल्या होत्या. सकाळच्या सुमारास त्या ताडोबाच्या कोलारा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 97 येथे पोहोचल्या त्यावेळी वाघाने हल्ला केला. स्वाती ढुमणे यांच्या सोबत 4 वनमजूर सुद्धा होते. त्यांनी वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाघाने स्वाती यांना ओढून दाट जंगलात नेले. वाचा : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघाच्या हल्ल्याचा LIVE VIDEO यानंतर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. तातडीने अधिक कुमक बोलावली गेली. ही माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आसपासच्या परिसरात शोध मोहिम हाती घेतली. वरिष्ठ अधिकारी -अधिक कुमक आल्यावर शोधमोहिमेत मृतदेह सापडला. सध्या व्याघ्रगणनेसाठी देशातील सर्वच जंगलात वनविभागाच्या वतीने पूर्वतयारी केली जात आहे. सध्या व्याघ्रगणनेसाठी देशातील सर्वच जंगलात वनविभागाच्या वतीने Transect line survey चे काम केले जात आहे. सकाळी 7 वाजता कोलारा भागात याच कामासाठी पथक पोचले होते. मात्र 4 किमी आत गेल्यावर रस्त्यावर असलेल्या वाघामुळे पथकाने मार्ग बदलला. मात्र वाघाने मजुरांमागून चालत असलेल्या स्वाती यांना लक्ष्य केले.
    Published by:Sunil Desale
    First published: