मुंबई, 05 डिसेंबर : शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे वाताहत झाली आहे. त्यामुळे आता शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग केला जात आहे. आज पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांची बैठक होणआर आहे. त्यामुळे युतीच्या चर्चांना उधाण आले आहे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन पक्षाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मुंबईतील फोर सिझन हॅाटेलमध्ये आज दुपारी 12 वाजता बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र करण्यासाठी महत्वाची चर्चा होणार आहे. येणाऱ्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात देखील चर्चा होणार असल्याची माहिती मिळती आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
('शेलारमामा नेभळटासारखे फक्त...',सेनेनं उडवली आशिष शेलारांची खिल्ली)
काही दिवसांपूर्वी 'प्रबोधनकार डॉट कॉम' या संकेतस्थळाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर रविवारी एका मंचावर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, की आज एक प्रकारे कौटुंबिक रूप पाहायला मिळत आहे. दोन नातू एकत्र आलेत. रामदास आठवले असे बोलले होते की तुम्ही प्रबोधनकरांचे नातू आणि आम्ही वैचारिक नातू. प्रकाश आंबेडकर यांना भेटताना वेळ काढावा लागतो. आमचे वैचारिक व्यासपीठ एक आहे. दोन विचारांचे वारसे पुढे घेऊन जात आहोत, असं वक्तव्य ठाकरे यांनी केलं. या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
(निवडणूक कधीही घेतली तरी...; केसरकरांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर घणाघात)
तर 'एकत्र कधी येणार आहोत, याचा प्रश्न आला आहे, निवडणुका कधी होतात यावर आम्ही निर्णय घेणार आहोत. ताबतोब जर निर्णय झाला तर चांगलं आहे, आता झाला तर चांगलाच आहे' अशी सूचक प्रतिक्रिया आंबेडकर यांनी दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news