मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे उद्या भेटणार, सत्तास्थापनेची कोंडी फुटणार

मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे उद्या भेटणार, सत्तास्थापनेची कोंडी फुटणार

नेत्यांची वक्तव्य आणि ऐकमेकांवर टीका होत असली तरी दोन्ही बाजूने कोडीं फोडण्यासाठी प्रयत्न होत होते.

  • Share this:

प्रफुल साळुंखे, मुंबई 2 नोव्हेंबर : भाजप आणि शिवसेनेमध्ये निर्माण झालेले कोंडी फुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी भेटणार आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ही कोंडी फुटावी यासाठी पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू होत्या. नेत्यांची वक्तव्य आणि ऐकमेकांवर टीका होत असली तरी दोन्ही बाजूने कोडीं फोडण्यासाठी प्रयत्न होत होते. सत्ता वाटपाचा फॉर्म्युलाही तयार करण्यात आला असून या दोन नेत्यांच्या बैठकीत त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या रविवारी पावसाने नुकसान झालेल्या भागाच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी दौरा आटोपून सायंकाळी हे दोनही नेते मुंबईत येणार असून त्यानंतर दोघांमध्ये भेट होणार आहे. ही भेट कुठे होईल हे अजुन गुलदस्त्यात आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे 5 नोव्हेंबरला मुंबईत येण्याची शक्यता असून त्याआधी सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.

दिवसभरात काय घडलं?

सत्ता स्थापनेला उशीर होत असल्याने शिवसेना भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतेय. त्या प्रयत्नांचाच भाग म्हणून राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देणार का अशी चर्चा सुरू आहे. मात्र राष्ट्रवादीला जनमतात बसण्याचा कौल मिळाला असून  ज्यांना जनतेने कौल दिला त्यांनी सरकार स्थापन करावं असं मत राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केलं. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या दबावाच्या प्रयत्नांना धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी  आणि शिवसेना एकत्र येवून भाजपला चेकमेट देऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र शुक्रवारी सोनिया गांधींनीच शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता फेटाळून लावली तर राष्ट्रवादीही शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता दिसत नाहीये. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता फेटाळली होती.

कोंडी फोडण्यासाठी भाजप-शिवसेना आज पहिल्यांदाच बसणार आमनेसामने?

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने केलेली 10 हजार कोटींच्या मदतीची घोषणा अपुरी असून सरकारने काय थट्टा चालवली आहे का असा सवलाही त्यांनी केला. दरम्यान, भाजप-शिवसेनेमध्ये सत्तावाटपासाठी निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी आज भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. रात्री ही बैठक होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केलीय. त्याबाबतचा एक प्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिलाय. निकालानंतर गेल्या आठ दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये कोंडी निर्माण झालीय. महायुतीला बहुमत मिळूनही सत्तेत जास्तीत जास्त वाटा मिळावा यासाठी शिवसेना दबावाचा प्रयत्न करतंय. तर भाजप मुख्यमंत्रिपदावर ठाम आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान युती करताना जे ठरलं होतं त्यानुसारच सत्तावाटप व्हावं अशी शिवसेनेची मागणी आहे.

स्थापन होताच सरकार येणार धोक्यात, सट्टाबाजारातील अंदाजाने खळबळ

त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्यावेळी युती करताना नेमकं काय ठरलं होतं याची चर्चा करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी भेटावं असा भाजपचा प्रस्ताव आहे. त्यामुळे ही भेट होण्याची शक्यता व्यक्त केलीय जातेय. कुठल्याही परिस्थितीत अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद पाहिजे अशी शिवसेनेची मागणी आहे तर पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच ठेवण्यावर भाजपचा जोर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 10:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading