• होम
  • व्हिडिओ
  • बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार?
  • बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार?

    News18 Lokmat | Published On: Nov 17, 2018 01:52 PM IST | Updated On: Nov 17, 2018 01:52 PM IST

    मुंबई, 17 नोव्हेंबर : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सहावा स्मृतिदिन आहे. यावेळी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक दाखल होत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच स्मृतिस्थळावर अभिवादन केलं. चार वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी महापौर बंगल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणार असल्याचं जाहीर केलं होतं. न्यूज १८ लोकमतला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंची आज संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये बाळासाहेबांचं स्मारक नेमकं कसं असेल, याबाबत सादरीकरणही केलं जाणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी