'उद्धव ठाकरेंसोबत मोठ्या भावाचं नातं; फडणवीस यांच्या रुपानं शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार'

'उद्धव ठाकरेंसोबत मोठ्या भावाचं नातं; फडणवीस यांच्या रुपानं शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार'

भाजपने मुख्यमंत्रिपदावर दावा सोडलेला नाही हा संदेश शिवसेनेला दिला.

  • Share this:

मुंबई, 07 नोव्हेंबर: राज्यात सत्तास्थापनेचा गोंधळ सुरु असताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत महत्त्वाची अशी घोषणा करत महाराष्ट्रात पुन्हा एकदा युतीचे सरकार येणार असल्याचे ठामपणे सांगितले. गुरुवारी राज्यपालांची भेट घेण्याच्या काही तास आदी मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार, असे सांगत भाजपने मुख्यमंत्रिपदावर दावा सोडलेला नाही हा संदेश देखील शिवसेनेला दिला.

राज्यातील राजकीय कोंडीवर अनेक चर्चा होत आहेत. याच असे देखील बोलले जात आही की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा राज्याच्या राजकारणात येतील. यावर बोलताना गडकरी साहेब कधीच राज्याच्या राजकारणात येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्याच बरोबर राज्यात स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. यासाठी शिवसेनेसोबत काही स्थरावर चर्चा सुरु असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेशिवाय अन्य कोणत्याही पर्यायाचा विचार करू नका असे आदेश दिल्लीतून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार येणार. तसेच शिवसेनेचे आमदार कोणी फोडत नाहीत असेही ते म्हणाले.

काय म्हणाले मुनगंटीवार

-गडकरी साहेब राज्याच्या राजकारणात येणार नाहीत

-राज्याला स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार

-काही स्थरावर शिवसेनेसोबत चर्चा सुरु

-दुपारी राज्यपालांची भेट घेणार

-फडणवीसांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार

-आमदारांना कमजोर समजण्याचे कारण नाही

-उद्धव ठाकरे यांच्या सोबत भावाचे नाते

-सेनेचे आमदार कोणी फोडत नाही

-काँग्रेसची भूमिका विरोधी पक्षात बसण्याची आहे

-राष्ट्रवादीची देखील हीच भूमिका

-शिवसेनेसोबतच युती केली पाहिजे दुसरा पर्याय शोधू नये

-अन्य पर्यायाचा विचार करणार नाही

-संघ कधीही राजकारणात सक्रीय सहभाग घेत नाही

-भाजप आज सरकार स्थापनेचा दावा करणार नाही

-तसेच भाजप अल्पमतातील सरकार देखील स्थापन करणार नाही

First published: November 7, 2019, 12:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading