सेनेच्या शिलेदारांची 'मातोश्री'वर बैठक, उद्धव ठाकरेंनी दिला 'हा' आदेश

सेनेच्या शिलेदारांची 'मातोश्री'वर बैठक, उद्धव ठाकरेंनी दिला 'हा' आदेश

आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांना 'मातोश्री'वर बोलावलं होतं.

  • Share this:

उदय जाधव, प्रतिनिधी

मुंबई,03 डिसेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने आज सर्व मंत्री आणि आमदारांची 'मातोश्री'वर बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्री आणि आमदारांना दुष्काळग्रस्त गावांचा आढावा घेण्याचे आदेश दिल्याची सूत्रांनी माहिती दिली.

आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्री आणि आमदारांना 'मातोश्री'वर बोलावलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनीसर्व मंत्र्यांना दुष्काळग्रस्त गावांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहे.

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात भीषण दुष्काळाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे. याच दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व मंत्र्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू करावे अशी सुचनाही उद्धव ठाकरेंनी दिली.

तसंच सरकारने दुष्काळग्रस्त भागात जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी होतेय का नाही, याची माहिती घ्या आणि कॅबिनेट बैठकीमध्ये आक्रमकपणे जाब विचारा असा आदेशही दिला आहे.

शिवसेना मंत्र्यांचा दुष्काळग्रस्त गावातील आढावा रिपोर्ट आल्यावर उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

याआधीही आॅक्टोबर महिन्यात उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा केला होता. त्यानंतर दसऱ्या मेळाव्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सरकारकडे केली होती.

दरम्यान, 31 आॅक्टोबर रोजी राज्यातील 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला तर 112 तालुक्यात गंभीर परिस्थिती आणि राज्याच्या 39 तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

दुष्काळ घोषित केल्याचे आदेश31 ऑक्टोबर 31पासून अंमलात आणले गेले. शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील 6 महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहतील. दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांत सुविधा देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे.

दुष्काळ जाहीर झाल्यास कोणत्या सवलती मिळणार?

ज्या तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात येईल त्या तालुक्यांतील महसूल वसुली, शेतकऱ्यांचं वीज बिल आणि शैक्षणिक शुल्क वसुलीलाही स्थगिती देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

राज्यात यंदा कुठे, किती पाऊस झाला?

यंदा राज्यात सरासरी 75 टक्के पाऊस झाला आहे. काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असला तरीही बहुतांश भागांत पाऊस रुसलेलाच पाहायला मिळाला.

- सोलापूर जिल्ह्यात फक्त 25 टक्के पाऊस

- 13 जिल्ह्यांत 50 टक्के ते 75 टक्के पाऊस

- 26 तालुक्यांत फक्त 25 टक्के पाऊस

- 139 तालुक्यांत 50 टक्के पाऊस

- 123 तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती

कोणत्या भागात होतोय टँकरने पाणीपुरवठा?

- 342 गावं आणि 498 वस्त्यांमध्ये पाणीटंचाई

- एकूण टँकर - 354

- मराठवाडा - 198 टँकर

- खानदेश - 125 टँकर

- कोकण - 53 टँकर

- नागपूर विभागात एकही टँकर लावण्यात आला नाही.

=======================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2018 09:23 PM IST

ताज्या बातम्या