उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात भेट

उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात भेट

उदयनराजे भोसले यांनी आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत मंत्रालयात जाऊन भेट घेतली.

  • Share this:

मुंबई, 09 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उदयनराजे यांनी राजधानी महोत्सव सातारा 2018 या कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी ही भेट घेतल्याचं सांगण्यात येतंय.

उदयनराजे भोसले यांनी आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत मंत्रालयात जाऊन भेट घेतली. उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून राजधानी महोत्सव सातारा 2018 या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी या संदर्भात निमंत्रण दिलं असल्याचं सांगण्यात येतंय.

मात्र, या भेटी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. उदयनराजेंच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2018 09:03 PM IST

ताज्या बातम्या