मनोज कुळकर्णी, प्रतिनिधी
मुंबई, 31 ऑक्टोबर : मराठा समाजाला (maratha reservation) ओबीसी कोट्यामधून आरक्षण (OBC reservation) देण्याबद्दल काही मराठा समाजाचे नेते म्हणत आहे, असा प्रस्ताव दिला तर ओबीसी समाज हे खपवून घेणार नाही. असं जर झाले तर याविरोधात उग्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा ओबीसी समाजाचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे (Prakash Shendge) यांनी दिली आहे. तसंच, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी फक्त मराठा समाजासाठी न झटता सर्व समाजासाठी काम करावे, असा टोलाही शेंडगे यांनी लगावला.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर OBC आणि VJNT संघर्ष समितीकडून आज मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत प्रकाश अण्णा शेंडगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे.
'मराठा समाजाच्या नेत्यांनी सरकारकडे काही ही मागणी केली तर सरकार लगेच त्यांना प्रतिसाद देते. राज्य सरकार जर मराठा समाजाला आमच्यापेक्षा वेगळं 13 टक्के आरक्षण देणार असेल तर त्याला आमची हरकत नाही. पण जर ओबीसी आरक्षणाला हात लावला तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराच शेंडगे यांनी दिला.
पंकजा मुंडे सेनेत येणार का? संजय राऊतांचे सूचक विधान
'जो न्याय मराठा समाजाला देत आहे. तो न्याय ओबीसी समाजाला दिला जात नाही. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टातून स्थगिती आली म्हणून आमच्या वाट्यातील आरक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे. तो आम्ही हाणून पाडू', असंही शेंडगे म्हणाले.
विजय वडेट्टीवार हे ओबीसी नेते आहेत म्हणून त्यांच्याकडून सारथीचं अध्यक्षपद का काढून घेण्यात आले आहे. जो न्याय मराठा समाजाला तोच ओबीसींना द्या, त्यामुळे येत्या 3 नोव्हेंबरला राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणाच प्रकाश शेंडगे यांनी केली.
अजब आहे राव! जीव वाचवण्यासाठी म्हशीचं मुंडण, नेमका काय आहे प्रकार पाहा VIDEO
'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांनी फक्त मराठा समाजासाठी न झटता सर्व समाजासाठी काम करावं', असा टोलाही प्रकाश शेंडगे यांनी उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे यांचं नाव न घेता लगावला.
'मराठा समाजाच्या काही नेत्यांनी नोकर भरती, एमपीएससीच्या परीक्षा बंद पाडल्या आहे. महाविद्यालयीन प्रवेश बंद पाडले आहे, त्यामुळे नेमकं सरकार कोण चालवत आहे?' असा सवालही शेंडगे यांनी उपस्थितीत केला.
बापरे, सोयाबीन मळणी यंत्रात अडकून महिलेचे शीर झाले धडा वेगळे,उस्मानाबादेतील घटना
'मराठा राजकीय पुढाऱ्यांमुळेच मराठा समाज मागासला आहे. मराठा समाज म्हणतो आरक्षण मिळालं नाही तर तलवार उपसू, जर असं असेल तर आम्ही सुद्धा ढाल समोर करू. ओबीसी समाजाने ठरवलं तर मुंबई बंद पडू शकते. मराठा समाजाच्या नेत्यांनी ओबीसी समाजाला डिवचू नये, त्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल, अशा इशारा दामोदर तांडेल यांनी दिला.