'जो तुम्हारे दिल में, वो मेरे दिल में नही', मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर उदयनराजेंचं उत्तर

'जो तुम्हारे दिल में, वो मेरे दिल में नही', मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर उदयनराजेंचं उत्तर

राजधानी महोत्सवाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्रांसोबत काही प्रमुख मंत्री, अनेक पक्षाचे नेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही भेटल्याचा खुलासा उदयनराजे यांनी केला.

  • Share this:

मुंबई, 09 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांचे तुफान आलं. पण, 'जो तुम्हारे दिल में, वो मेरे दिल में नही', असं आपल्या शैलीत उत्तर देत उदयनराजेंनी चर्चेला पूर्णविराम लावला.

राज्यभरात निवडणुकाचे वारे वाहत आहे तसे या पक्षातून त्या पक्षात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. अशातच राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी  आज दुपारी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस आणि उदयनराजे यांच्यात तब्बल दीड तास चर्चा केली. अनेक विषयांवर ही चर्चा झाल्याचा कयास आहे.

अलीकडे अनेक नेते पक्षांतर करत असताना कधी हा कधी ना मध्ये असणारे उदयनराजे भाजप मध्ये जाणार का हा प्रश्नही उपस्थित झाला. मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांचीही उदयनराजे यांची अलीकडे जवळीक वाढल्याने भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण राजेंनी स्वीकारले नाही आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन हे स्पष्ट केले असा अंदाज सुद्धा काढला जातो आहे.

दरम्यान, राजधानी महोत्सव सातारा 2018 या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्रांसोबत काही प्रमुख मंत्री, अनेक पक्षाचे नेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही भेटल्याचा खुलासा उदयनराजे यांनी केला. "जो तुम्हारे दिल मे वो मेरे दिल में नही", असं सांगत त्यांनी बिनधास्तपणाची झलकही दाखवली.

First published: May 9, 2018, 10:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading