Home /News /mumbai /

म्हाडाच्या घरांवर 47 टक्क्यांपर्यंत सूट; मुंबईत सव्वा कोटीचं घर मिळणार 82 लाखात!

म्हाडाच्या घरांवर 47 टक्क्यांपर्यंत सूट; मुंबईत सव्वा कोटीचं घर मिळणार 82 लाखात!

सर्वसामान्यांना परवडतील या उद्देशाने म्हाडच्या 2441 घरांवर आता जवळपास 20 ते 47 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली.

    मुंबई, 12 ऑक्टोबर : म्हाडाच्या घराच्या किमती आत सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार असल्याची घोषणा म्हाडाचे उदय सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. म्हाडाच्या 2441 घरांवर 20 ते 47 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार असून, पुढील 10 दिवसांत म्हाडाच्या नव्या किमती जाहीर होणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केलं. म्हाडाच्या किमतीही आसमंताला जाऊन भिडल्या असल्यामुळे म्हाडाची घरं घेणंसुद्धी सर्वसांमान्यांच्या आवाक्याबाहेर होऊन गेलं होतं. परिणामी राज्यात अनेक ठिकाणी बांधून तयार असेली म्हाडाची घरे न विकल्या गेल्यामुळे तशीच पडून होती. म्हाडाची अशी न विकल्या गेलेली 918 घरे औरंगाबादेत, 1150 घरे नाशकात तर 376 घरे नागपुरात आहेत. सर्वसामान्यांना परवडतील या उद्देशाने म्हाडच्या 2441 घरांवर आता जवळपास 20 ते 47 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली. तर येत्या 10 दिवसांत म्हाडाच्या नव्या किमती जाहीर केल्या जाणार असल्याचेही त्यानी यावेळी सांगितले. म्हाडाने केलेल्या या नव्या बदलाचा सर्वसामान्यांना निश्चितच फायदा होणार आहे. टागोर नगरातलं घर जे 1 कोटी 17 लाखांचं आहे ते आता 82 लाख 12 हजारांना मिळेल. म्हाडाने बांधलेली आणि विकासकाकडून प्रीमियम स्वरूपात मिळालेल्या घरांची लॉटरी वेगळी राहणार आहे. अशा 1194 घरांच्या लॉटरीची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती कमी करण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता मिळाली असून, या घरांच्या किमती आता रेडी रेकॉनरच्या 70 टक्के दराने ठरणार असल्याचं सामंत यांनी यावेळी सांगितले. म्हाडाची घर बांधण्याची मक्तेदारी आता संपुष्टात येणार असून, यापुढे लहान लहान टेंडर काढून अनेक विकासकांकडून घरे बांधण्याच्या कामाला आता पूर्णविराम दिली जाणार आहे. यापुढे विकासकाला 3 वर्षांच्या आत दरवाढ दिली जाणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. म्हाडाच्या घरांच्या किमती कमी केल्यानंतरही ही घरं विकल्या गेली नाहीत तर ती पोलिसांना देता येतील का याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. म्हाडाच्या जिम, पार्किंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, लिफ्ट, आग प्रतिबंधक योजना, ग्रंथालय या प्रस्तावांनाही तत्वताः मान्यता देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना 17 हजार बोनस, 5 हजर रुपये वैद्यकीय भत्ता, तसेच दरवर्षी वैद्यकीय भत्त्यात 5 टक्क्याने वाढ केली जाणार आहे. म्हाडाच्या ड्राइवरचा धुलाई भत्ता आता 50 रुपयांवरून 250 रुपये करण्यात आला आहे. तसेच त्याला दरवर्षी ड्रेसचे 3 सेट आणि शिलाई साठी 1500 रुपये दिले जाणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. हनीमूनला गेलेल्या जोडप्याने नशेत विकत घेतले पूर्ण हॉटेल
    First published:

    Tags: General public, House prices, Mhada, Mumbai, Uday samant, Will reduce, आवाक्यात येणार, उदय सामंत, घराच्या किमती, मुंबई, म्हाडा, सर्वसामान्यांच्या

    पुढील बातम्या