मुंबई, 27 जून : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी पुकारलेले बंड आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे, नव्याचे दाखल झालेले शिवसेनेचे नेते आणि उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (udaya samant) फेसबुक लाईव्ह करून भूमिका मांडणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला आव्हान देत थेट सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. शिंदे गटाच्यावतीने 15 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत दोन गोष्टींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. एक तर आमदारांनी उपाध्यक्षांना बेकायदेशीर ठरवून आमदारांना अपात्र ठरविण्याच्या नोटिशीला आव्हान दिले आहे आणि दुसरे म्हणजे त्यांनी स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला न्यायालयाकडून संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
या याचिकेबद्दल एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये सकाळी १० वाजता न्यायप्रक्रियेचा आढावा घेणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता शिंदे गटात दाखल झालेले सेनेचे नेते उदय सामंत फेसबुक live करणार आहे. त्यानंतर शिंदे गटाची दुपारी २ वाजता महत्वाची बैठक होणार आहे.
(बाप बदलण्याची भाषा कोण करतंय? राऊतांनी केसरकरांना दाखवला गुलाबराव पाटलांचा VIDEO)
एकनाथ शिंदे यांच्या गटाने गेल्या 7 दिवसांपासून गुवाहाटीमध्ये मुक्काम ठोकला आहे. शिवसेनेचे नेते उदय सामंत कालपर्यंत राज्यात राहून शिंदे गटावर टीका करत होते. ते अचानक नॉट रिचेबल झाले आणि गुवाहाटीला पोहोचले. आता उदय सामंत फेसबुक लाईव्ह करून काय भूमिका मांडणार हे पाहण्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.