• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • VIDEO: राज्यपालांकडून उदय सामंत यांचं तोंडभरून कौतुक; शिवसेना नेत्याच्या कौतुकाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

VIDEO: राज्यपालांकडून उदय सामंत यांचं तोंडभरून कौतुक; शिवसेना नेत्याच्या कौतुकाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Governor Bhagat Singh Koshyari on Uday Samant: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचं कौतुक केलं आहे.

  • Share this:
मुंबई, 4 मे: महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) सत्ता आल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पहायला मिळत होते. इतकेच नाही तर सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) आणि राज्यपाल (Governor) यांच्यातही विविध विषयांवरुन राजकीय संघर्ष झाल्याचं पहायला मिळालं होतं. मात्र, असे असताना आता एक राजकीय चमत्कार झाल्याचं पहायला मिळालं आहे. कारण, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी चक्क शिवसेनेचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचं भरकार्यक्रमात कौतुक केल्याचं पहायला मिळालं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उच्च आणि शिक्षण मंत्री उदय सामंत यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. नांदेड विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभाच्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उदय सामंत यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. गेल्या दिडवर्षात राज्यात शिवसेना विरुद्ध राज्यपाल असा राजकिय संघर्ष सातत्याने पहायला मिळतोय. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि शिवसेनेचं नातं हे विळ्या-फोपळ्याचं नातं आता सर्वांनाच चांगलंच माहीती झालंय. अशातच नांदेड विद्यापिठाच्या दिक्षांत सभारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जाहीरपणे थेट शिवसेनेचे दिग्गज मंत्री उदय सामंत यांचं तोंडभरून कौतुक केलं. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. नेमकं काय म्हणाले राज्यपाल? वाचा: नितीन मानेंशी आमचा काही संबंध नाही! NCPचं स्पष्टीकरण, 'त्या' पत्रामुळे माजली होती खळबळ शिक्षण मंत्र्यांनी तुम्हाला सर्वांना खूप काही सांगितलं आहे. मला खूप चांगलं वाटलं. विद्यापीठाच्या विविध विषयांच्या संदर्भात मी त्यांच्यासोबत असतो. आज ज्या प्रकारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो आणि खासकरुन शिक्षणमंत्र्यांचं अभिनंदन करतो. राज्याच्या राजकिय वर्तुळात याची चांगलीच चर्चा सुरू झालीय. राज्यपाल आणि शिवसेनेचं नातं आता संघर्षाकडून समझोत्याकडे तर जात नाहीयेना अशी शंकाही काही राजकीय वर्तुळाच विचारली जात आहे.
Published by:Sunil Desale
First published: