व्यवसायात मोठी फसवणूक झाल्याचं सांगत उबर चालकाची आत्महत्या

व्यवसायात मोठी फसवणूक झाल्याचं सांगत उबर चालकाची आत्महत्या

उबर व्यवसायात फसवणूक होत असल्याच्या नैराश्यातून एका उबर टॅक्सी चालकाने आत्महत्या केली आहे. उत्तम गारगोटे असं या चालकाचं नाव आहे.

  • Share this:

अक्षय कुडकेलवार, प्रतिनिधी

मुंबई, 25 ऑक्टोबर : उबर व्यवसायात फसवणूक होत असल्याच्या नैराश्यातून एका उबर टॅक्सी चालकाने आत्महत्या केली आहे. उत्तम गारगोटे असं या चालकाचं नाव आहे. उबर व्यवसायात फसवणूक होत असल्याने अनेक दिवसांपासून ते तणावात होते आणि त्यातून त्यांनी आत्महत्येचं हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

काल रात्री १०:३०च्या सुमाराच विषप्राशन करून उत्तम यांनी आत्महत्या केली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे काल रात्रीच व्यवसायात यश येत नसल्याचं उत्तम यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं. तर टॅक्सीचं भाडं थकलं असल्याचंही दु:ख त्यांनी पत्नीजवळ व्यक्त केलं. त्यानंतर उत्तम यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली.

त्यात गेल्या तीन दिवसांपासून ओला आणि उबरचा संप सुरू आहे. त्याचा व्यवसायावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे उत्तम हे आर्थिक अडचणीत सापडले होते. अचानक आलेल्या या आर्थिक संकटाला वैतागून उत्तम यांनी अखेर आपलं आयुष्य संपवलं.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी उत्तम यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तो मुंबईच्या राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

तर या सगळ्यात उत्तम यांची कोण फसवणूक करत होतं, त्यांना आत्महत्येस प्रवृत्त तर करण्यात आलं नव्हतं ना याचा आता पोलीस कसून तपास करत आहे. आपल्या पतीच्या अशा अकाली जाण्याने त्यांच्या पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे तर या घटनेबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

VIDEO: पत्नीच्या जागेवर स्टॉल लावला म्हणून शिवसैनिकांनी उत्तर भारतीयाला धुतलं

बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2018 12:04 PM IST

ताज्या बातम्या