उबर चालकाचं महिला प्रवाशासमोर हस्तमैथून, ड्रायव्हर निलंबित

उबर चालकाचं महिला प्रवाशासमोर हस्तमैथून, ड्रायव्हर निलंबित

मुंबईत उबर चालकाने महिला प्रवाशासमोर हस्तमैथून केली असल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

05 मे : ट्रेन असो बस असो वा आता ओला आणि उबर, महिला कोणत्याच ठिकाणी सुरक्षित नाही आहे आणि याचा वाईट प्रत्यय काल मुंबईत आला. मुंबईत उबर चालकाने महिला प्रवाशासमोर हस्तमैथून केली असल्याची घटना समोर आली आहे.

महिलेने यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. घटनेची माहिती मिळताच उबरने चालकाला कामावरुन काढून टाकलं आहे. आमच्याकडे अशा चुकांना जागा नाही असंही उबर कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

शुक्रवारी सकाळी अंधेरीत हा प्रकार घडला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उबरने तात्काळ चालकावर निलंबनाची कारवाई केली. 'जे झालं आहे त्यासाठी आमच्याकडे जागा नाही. आम्ही आमच्या मार्गदर्शक तत्वांवर ठाम असून, हे सहन केलं जाऊ शकत नाही. घटनेची माहिती मिळताच आम्ही त्याला हटवलं आहे', असं उबरच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे.

 

First published: May 5, 2018, 9:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading