मुंबई, 18 ऑक्टोबर : 'आमच्यासमोर कुणी पैलवानच उरला नाही', अशी आरोळी ठोकून भाजपने 2019 ची विधानसभा निवडणूक जिंकण्याचा चंग बांधला खरा पण त्यांच्या मनसुब्यावर राष्ट्रवादीचे (ncp) अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी पाणी फेरले. शरद पवार यांची ठीक दोन वर्षांपासून भर पावसात सभा पार पडली होती. अवघ्या महाराष्ट्राने ही सभा पाहिली आणि राष्ट्रवादीला सत्तेची वाट मोकळी करून दिली. 'हाच तो क्षण, हिच ती वेळ' असं म्हणत आज दोन वर्षांनंतर सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी या सभेची आठवण करून दिली.
18 ऑक्टोबर 2019 रोजी साताऱ्यात शरद पवारांनी जिल्हा परिषदेच्या मैदानावर सभा आयोजित केली होती. आधीच पावसाचे ढग जमा झाले होते. त्यामुळे सभेवर पावसाचे संकट होते. पण या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सभेदरम्यान पावसाची भूरभूर सुरू झाली होती शरद पवार भाषणासाठी उभे राहिले तेव्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पण, शरद पवारांनी भाषण थांबवले नाही. पावसात भिजत पवारांनी खणखणीत भाषण केले.
आज या सभेला दोन वर्ष झाले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्ट करून या सभेच्या आठवणीला उजाळा देत केंद्रावर निशाणा साधला.
चआज बरोबर दोन वर्षे झाली, जेंव्हा पुन्हा एकदा सिद्ध झाले की, महाराष्ट्राचा स्वाभिमानी यशवंत विचार कधीही दिल्लीच्या तख्तापुढे झुकला नाही आणि यापुढेही झुकणार नाही.' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या या ऐतिहासिक सभेचा निकालही तसाच लागला होता. राष्ट्रवादीची साथ सोडून उदयनराजे भोसले भाजपमध्ये गेले होते. त्यावेळी या सभेत पवार म्हणाले की, 'लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातील उमेदवार निवडण्यात मी चूक केली. आता ही चूक आपल्याला दुरुस्त करायची आहे'
“तो त्याच्याच माणसांशी दगाबाजी करतो” ; उत्कर्ष - जयचा रोख कोणाकडे ?
शरद पवार यांनी केले हे आवाहन साताऱ्यातील तमाम जनतेनं मनावर घेतले आणि दुसऱ्यांदा खासदारकीची निवडणूक लढवणारे उदयनराजे भोसले पराभूत झाले. ज्या साताऱ्यात राष्ट्रवादीच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आलो होतो, त्याच राष्ट्रवादी पक्षाचे श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंना पराभव केला होता. उदयनराजे यांना हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता. एव्हाना भाजपाला ही मोठा धक्का होता. कारण, भाजपने उदयनराजेंच्या विजयासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी सभा घेतल्या होत्या. पण, सातारकरांनी शरद पवारांना साथ दिली.
आईने 6 व्या महिन्यात दिला पेन इतक्या आकाराच्या बाळाला जन्म; डॉक्टरही हैराण
निवडणुकीच्या मैदानात बॅकफुटवर गेलेल्या राष्ट्रवादीने या सभेमुळे जोरदार कमबॅक केले. राष्ट्रवादीला कमी जागा येतील असा अंदाज असताना अपेक्षित यश मिळाले. विशेष म्हणजे, सत्तेचं स्वप्न न पाहणाऱ्या राष्ट्रवादीने पुढे शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेही ही सभा पक्षासाठी मैलाचा दगड ठरली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Supriya sule, शरद पवार