Maharashtra Lockdown : लॉकडाऊनची नियमावली ठरली, लोकलबाबत महत्त्वाची माहितीसमोर

Maharashtra Lockdown : लॉकडाऊनची नियमावली ठरली, लोकलबाबत महत्त्वाची माहितीसमोर

कोविड19 संसर्गाची ही दूसरी लाट पहिल्या लाटेच्या तिप्पट तीव्रतेची असल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे राज्यातील कोविड19 संसर्गाची दूसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज निर्माण झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 एप्रिल : कोरोनाबाधित  (Corona) देशात सर्वाधिक अधिकृत रुग्ण संख्या महाराष्ट्राची (Maharashtra corona cases)  आहे. त्यामुळे भविष्यातील कोविड 19 (Covid 19) संसर्ग विस्फोट टाळण्यासाठी राज्य सरकार सलग काही दिवस कडक लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लावण्याच्या पवित्र्यात आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकार 2.0 लॉकडाऊनची नियमावली दोन दिवसांत जाहीर करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, राज्यात सलग दोन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन घोषित होणार आहे.

गेल्या वर्षीप्रमाणे अती कडक लॉकडाऊन न लावता, सर्वसामन्य नागरिकांना जीवनावश्यक गोष्टींसाठी सूट देत आणि हातावर पोट असणाऱ्या अति-गरीब वर्गातील नागरिकांना, काही प्रमाणात आर्थिक मदत करण्यासंदर्भातही नियोजन राज्य सरकार करत असल्याची माहिती मिळत आहे. कोविड 19 संसर्गाची ही दूसरी लाट पहिल्या लाटेच्या तिप्पट तीव्रतेची असल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे राज्यातील कोविड 19 संसर्गाची दूसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता दोन तासांहून कमी विमान प्रवासासाठी नवा नियम

कोरोना संसर्गाची दूसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊनची नियमावली दोन दिवसांत जाहीर करणार आहे. पण हा लॉकडाउन 7 दिवसांचा लागेल की सलग 15 दिवसांचा लागेल. या संदर्भात लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. पण न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सलग दोन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन घोषित होणार आहे.

रुग्णाला घेऊन जात असताना अचानक घेतला रुग्णवाहिकेनं पेट, अमरावतीतील घटना

मात्र, या लॉकडाऊनमध्ये नागरिकांना जीवनावश्यक गोष्टींसाठी दिलासाही मिळणार आहे. दररोजचा भाजीपाला, अन्नंधान्य, दूध, अंडी आणि इतर आवश्यक गोष्टी घेण्यासाठी सवलत मिळणार आहे. तसंच गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये परप्रांतीय मजूर कुटुंबासह शेकडो किलोमीटर पायी चालत आपापल्या गावी गेले. तेव्हा त्यांचे जे हाल झाले ते हृदय हेलावणारे होते. तशी परीस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी राज्या बाहेरील रेल्वे सेवा सुरूच ठेवणार असल्याची माहिती मिळतेय.

सर्वसामान्यांसाठी लोकल होणार बंद!

जेणेकरून ज्यांना आपल्या राज्यात जायचे असेल त्यांना रेल्वेतून प्रवास करता येईल. मात्र मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा मात्र सर्व सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात येणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच लोकल मधून प्रवास करता येणार आहे. राज्यावर आलेलं कोविड 19 संसर्गाचं संकट नियंत्रात आणायचं असेल तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. मात्र, लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करताना नागरिकांचा संवेदनशीलतेनं विचार करणे गरजेचं आहे. जेणेकरून  उद्रेक होणार नाही.

Published by: sachin Salve
First published: April 12, 2021, 10:47 PM IST

ताज्या बातम्या