राणीच्या बागेत येणार औरंगाबादचे पाहुणे... करिष्मा आणि शक्ती मुंबईच्या दिशेने रवाना!

राणीच्या बागेत येणार औरंगाबादचे पाहुणे... करिष्मा आणि शक्ती मुंबईच्या दिशेने रवाना!

मुंबईमधील भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयात औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील रुबाबदार वाघांची जोडी लवकरच येणार आहेत.

  • Share this:

औरंगाबाद, 4 फेब्रुवारी : भारतात पिवळ्या पट्टेरी वाघांची दिवसेंदिवस कमी होत चाललीये. त्यामुळे वाघ क्वचितचं बघायला मिळतात. मात्र आता मुंबईकरांना हे वाघ बघण्याची संधी चालून आली आहे. कारण औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील रुबाबदार वाघांची जोडी आता मुंबईला रवाना करण्यात आली. मादीचे नाव आहे करिष्मा आणि नराचे नाव आहे शक्ती. केंद्रीय उद्यान कायद्या नुसार ही जोडी मुंबई येथील भायखळ्याच्या राणीच्या बागेत अर्थात जिजामाता उद्यानात ठेवली जाणार आहे.

केंद्रीय उद्यान कायद्यानुसार एखाद्या प्राणी संग्रहालयातील प्राणी दुसऱ्या प्राणी संग्रहालयात द्यायची असतील तर त्या बदल्यात पैसे घेता येत नाहीत, तर प्राण्यांच्या बदल्यात प्राणीच घ्यावे लागतात. त्यामुळे औरंगाबाद येथील करिष्मा आणि शक्ती च्या बदल्यात भायखळा येथून दोन हरणांच्या जोड्या औरंगाबाद येथील प्राणी संग्रहालयात येणार आहेत.

औरंगाबाद येथील प्राणी संग्रहालय पिवळ्या वाघांची संख्या 14 पर्यंत गेली आहे. त्यामुळे एवढ्या वाघांना ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत होती आणि त्यांच्या खाण्याचा खर्च ही वाढला होता. त्यामुळे करिष्मा आणि शक्ती यांना भायखळ्याच्या उद्यानात पाठवण्यात येत आहे.

करिष्माचा जन्म औरंगाबाद उद्यानातच झाला आहे. आज तिचे वय साडे चार वर्षाचे आहे. शक्ती सुद्धा औरंगाबाद येथीलच उदयनात जन्माला आला असून त्याचे वय साडे तीन वर्ष आहे. शक्ती आणि करिष्मा ही जोडी औरंगाबाद चे महापौर नंदू घोडीले यांनी दत्तक घेतली होती. ते त्यांना पाहायला नेहमी प्राणी संग्रहालयात यायचे. त्यामुळे महापौर करिष्मा आणि शक्तीची रवानगी होताना पाहून भावनिक झाले होते...मात्र भायखळा येथे सुद्धा नागरिक आणि उद्यान व्यवस्था करिष्मा आणि शक्तीची चांगली देखभाल करतील आणि जीव लावतील, अशी आशा घोडीले यांनी व्यक्त केली आहे.

First published: February 11, 2020, 9:50 PM IST
Tags: tiger

ताज्या बातम्या