मुंबईत उद्या दोन 'ठाकरे' आमने-सामने, शक्तिप्रदर्शन रंगणार

मुंबईत उद्या दोन 'ठाकरे' आमने-सामने, शक्तिप्रदर्शन रंगणार

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनसे आणि शिवसेना शक्तिप्रदर्शन करणार असून राज ठाकरे कुठली नवी भूमिका जाहीर करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

  • Share this:

मुंबई 22 जानेवारी : महाराष्ट्राच्या राजकारणात उद्याचा दिवस म्हणजे 23 जानेवारी हा वादळी ठरणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या जयंती असून हे औचित्य साधत मनसे आणि शिवसेनेनें मेळावे आयोजित केले आहेत. मनसेचा गोरेगावला महामेळावा होतोय तर शिवसेनेचा 'वचनपूर्ती जल्लोष' सोहळाही बीकेसीत होणार आहे. या निमित्त दोनही ठाकरे बंधू आमने-सामने येणार आहेत. राज ठाकरे हे महामेळाव्यात भाषण करतील तर उद्धव ठाकरे हे सरकारची भूमिका मांडतील. हे निमित्त साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाची नवी भूमिका जाहीर करणार असून ते कुठली भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

मनसेचे महाधिवेशना निमित्त मुंबईत ठिकठिकाणी मनसेकडून बॅनरबाजी केली जातेय. त्या बॅनरवरुन मनसेचा पूर्वीचा झेंडा गायब आहे. नव्या झेंड्याचे स्वरुप कसे असणार हे जरी अजून स्पष्ट नसले तरी नव्या झेंड्याचा रंग हा भगवा असणार आहे. यावरून राज ठाकरे यांची हिंदुत्वाची भुमिका अजून ठळक होत आहे.

या सोबतच काही दिवसांपूर्वी 'सत्तेसाठी सतराशे साठ मात्र महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट' या मजकूराचे बॅनर्स मनसेकडन लावण्यात आले होते. एकीकडे हिंदुत्वाच्या भुमिकेकडे आगेकूच करत असताना महाराष्ट्र धर्माचा विसर पडू देणार नाही असंही मनसेला सुचवायचे आहे असे दिसून येत आहे. मनसेकडून अधिवेशनाचे दोन व्हिडीओही रिलीज करण्यात आले आहेत.

मुंबईला हादरवणारा डॉन मन्या सुर्वे हा माझा भाऊ, नाना पाटेकरांचा मोठा खुलासा

या व्हिडीओला स्वतः राज ठाकरेंनी व्हॉईस ओव्हर दिलाय. ज्यात छत्रपती शिवाजी महाराज हे केंद्रस्थानी आहेत. छत्रपतींच्या लढाई साठी प्रत्येक जातीचा माणूस लढत होता असा आशय एका व्हिडीओमध्ये आहे तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये सगळ्या पक्षांचा आदर्श हे छत्रपती होते असा आशय आहे. एकूणच शिवसेनेची स्पेस घेण्याचा जोरदार प्रयत्न आता मनसेने सुरू केल्याचे दिसतेय.

शिवसेनेचंही शक्तिप्रदर्शन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त 'शिवसेना वचनपूर्ती जल्लोष' सोहळ्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जाहीर सत्कार होणार आहे. हा सत्कार सोहळा वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या वर्षी शिवसेनेची स्थापना केली होती. त्यावेळच्या शिवसेनेच्या पहिल्या फळीतील जेष्ठ शिवसैनिकांना या सत्कार सोहळ्यात गौरव होणार आहे.

CM उद्धव ठाकरेंचं पुन्हा 'जय श्रीराम', खासदारांना घेऊन धडकणार अयोध्येत

शिवसेनेनं राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केल्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी स्थापन केलेली ज्वलंत हिंदुत्ववादी शिवसेना आता राहीली नसल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येतेय. मात्र उद्या होणाऱ्या शिवसेना जल्लोष सोहळ्यात शिवसेना स्थापन करणाऱ्या जुण्या जाणत्या जेष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. त्यातून आजही पूर्वीचीच शिवसेना असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्नं, शिवसेनेकडून करण्यात येत असल्याचं बोललं जातंय.

First published: January 22, 2020, 8:48 PM IST

ताज्या बातम्या