कमला मिल अग्नितांडव : पाचगणीला जाण्याआधीच त्यांना गाठलं मृत्यूनं

कमला मिल अग्नितांडव : पाचगणीला जाण्याआधीच त्यांना गाठलं मृत्यूनं

काल रात्री कमला मिलच्या मोझो पबला आग लागली. त्यात या दोन आतेबहिणींना आपला जीव गमवावा लागला.तेजल गांधी आणि कविता पियुष धारानी अशी त्यांची नावं आहेत.

  • Share this:

29 डिसेंबर : नवीन वर्षाचं स्वागत पाचगणीला करण्यापूर्वी दोन बहिणींना कमला मिलच्या आगीत मृत्यूने गाठलं.काल रात्री कमला मिलच्या मोझो पबला आग लागली.  त्यात या दोन आतेबहिणींना आपला जीव गमवावा लागला.तेजल गांधी आणि कविता पियुष धारानी अशी त्यांची नावं आहेत.

घाटकोपर पूर्व इथं गारोडीया नगरमध्ये या बहिणी  राहायला होत्या.गांधी आणि धाराणी परिवारातील एकूण 7 जण कमला मिल इथल्या हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्यावेळी आग लागल्याचे त्यांना समजलं. त्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होत्या. तिथे असलेल्या स्वच्छतागृहात गेल्या.त्यांनी तिथून आपल्या कुटुंबाला याची माहिती फोन करून दिली.

त्यांचे कुटुंबातले सदस्य बाहेर पडले पण दोघीजणींचा मात्र या आगीत होरपळून मृत्यू झाला.

First published: December 29, 2017, 4:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading