काँग्रेसच्या दोन दिग्गज चव्हाणांची नावं पडली मागे, हे आहे त्याचं कारण

काँग्रेसच्या दोन दिग्गज चव्हाणांची नावं पडली मागे, हे आहे त्याचं कारण

पृथ्विराज चव्हाण यांचा अनुभव आणि त्यांची कारकिर्द बघून त्यांचं नाव विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी घेतलं जात होतं. मात्र राष्ट्रवादीनेही आता या पदावर आपला हक्क सांगितलाय.

  • Share this:

मुंबई 28 नोव्हेंबर : राज्यात महाआघाडीच्या सरकारचा आज संध्याकाळी शपथविधी शिवाजी पार्कवर होणार आहे. शिवसेना, राष्ट्रावादी आणि काँग्रेससह मित्रपक्षांच्या या आघाडीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलंय. गुरुवारी उद्धव ठाकरेंसह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे दोन मंत्री शपथ घेतील असं आता स्पष्ट झालंय. उद्धव ठाकरेंच्या या मंत्रिमंडळात काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सुद्धा शपथ घेतील असं बोललं जात होतं मात्र आदर्श प्रकरणातल्या नव्या चौकशीच्या फेऱ्यामुळे त्यांचा पत्ता कट झाल्याचं बोललं जातंय. पृथ्विराज चव्हाण हे मंत्रिमंडळात काम करण्यास फासरे इच्छुक नाहीत अशी शक्यताही व्यक्त केली जातेय. त्यामुळे त्यांचं नाव विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी घेतलं जातंय पण त्यातही राष्ट्रवादीने खोडा घातलाय अशी माहिती आता पुढे आली आहे.

पृथ्विराज चव्हाण यांचा अनुभव आणि त्यांची कारकिर्द बघून त्यांचं नाव विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी घेतलं जात होतं. मात्र राष्ट्रवादीनेही आता या पदावर आपला हक्क सांगितलाय. सराकारच्या कामकाजाच्या भूमिकेत अध्यक्षांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे सर्वच पक्ष या पदावर आपला दावा सांगत आहेत.

भुजबळांच्या विधानानं उपमुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स वाढला; कुणाचा पत्ता होणार कट?

तर पंतप्रधान कार्यालयातली यशस्वी कारकिर्द आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद काही वर्ष सांभाळल्याने पृथ्विराज चव्हाण यांची एक वेगळी प्रतिमा आहे. त्यामुळे काम करायला मोकळीक आणि वाव मिळत असेल तरच काम पृथ्विराज चव्हाण हे पद स्वीकारतील असाही अदांज व्यक्त केला जात आहे.

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आता काही तासांमध्ये शपथ घेणार आहेत. त्यावेळी अजित पवार नाराज असल्याचं पुन्हा एकदा पुढे आल्यानं खळबळ उडाली होती. तर अजित दादा नॉटरिचेबल आहेत असंही सांगितलं जात होतं. नंतर अजित पवार हे संपर्कात असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं होतं. नंतर अजित दादा हे शरद पवारांच्या भेटीलाही आले होते. त्या दोघांमध्ये पुन्हा एकदा प्रदीर्घ चर्चा झाली.

विधानसभा अध्यक्ष ठरेना! काँग्रेसच्या 'या' नेत्याची राष्ट्रवादीला अडचण

राष्ट्रवादीचा अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री असावा असा आग्रह अजित पवारांनी धरल्याचं पुढे येतंय. शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर अजित पवारांनी त्याबद्दल खुलासा केलाय. त्यात भर पडलीय ती छगन भुजबळांचं ताजं वक्तव्याची. 'आजच्या शपथविधीसाठी शरद पवारांनी दोन नेत्यांना निवडलंय, त्यातला एक मी आहे', अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पुण्यात दिली. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.

ठरलं! उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला राज ठाकरे उपस्थित राहणार

अजित पवार म्हणाले, आज सर्वच पक्षांचे दोन दोन नेते मंत्रिपदाची शपथ घेतील. मी आज शपध घेणार नाही. मंत्र्यांची नावं ही कळविण्यात आली आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार हा विश्वास दर्शक ठरावानंतर होईल. आज पक्षाने जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांना शपथ घेण्याचा आदेश दिला असं ते म्हणाले.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2019 04:12 PM IST

ताज्या बातम्या