धारावीत कोरोनाचा धोका वाढला, आणखी 2 जण पॉझिटिव्ह रुग्ण, आतापर्यंत संख्या 9 वर

धारावीत कोरोनाचा धोका वाढला, आणखी 2 जण पॉझिटिव्ह रुग्ण, आतापर्यंत संख्या 9 वर

काही दिवसांपूर्वी तबलिगी जमातचे 6 जण धारवी इथे राहण्यास आले होते.

  • Share this:

मुंबई, 08 एप्रिल : राज्यात कोरोनाचं थैमान सुरू आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा 700च्या वर गेला आहे. सर्वात जास्त जवळपास 500 हून अधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आशियातील सर्वात मोठी झोडपट्टी असलेल्या धारावीमध्ये आज पुन्हा दोन कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी धारवीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 7 होती त्यात आज आणखीन दोन रुग्ण वाढल्यानं एकूण 9 संख्या झाली आहे. दरम्यान धारवीतील कोरोनाग्रस्ताचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. वरळी कोळीवाडा, वरळी, लोअर परेल आणि धारावीतील काही भाग संपूर्ण सील करण्यात आला आहे. तिथल्या नागरिकांना घरात क्वारंटाइन करण्यात आलं आहे. नागरिकांना बाहेर पडण्याची मनाई केली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी तबलिगी जमातचे 6 जण धारवी इथे राहण्यास आले होते. 23 मार्चनंतर त्यातील 4 जण केरळला गेले. त्यामुळे उरलेल्या दोन तबलिगी जमातच्या लोकांचा शोध सुरू आहे. तसंच तबलिगी कनेक्शन काही आहे का?याचाही तपास केला जात आहे. भीतीदायक गोष्ट ही की धारावीत आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. त्यामुळे इथे कोरोना व्हायरस वेगानं फोफावण्यास वेळ लागणार नाही. हा संसर्ग या परिसरात रोखण्याचं प्रशासनापुढे सर्वात मोठं आणि जोखमीचं आव्हान आहे.

हे वाचा-COVID-19 : इटली भारताचा भविष्यकाळ? मुक्त बर्वेने शेअर केला थरकाप उडवणारा VIDEO

25 आणि 35 वर्षाचे दोन तरुण आहेत. 25 वर्षाचा तरुण हा राजीव कॉप्लेक्सजवळ राहातो. कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्यानं त्यालाही कोरोनाची लागण झाली होता. तर 35 वर्षीय तरुण हा धानवडा चाळ इथे राहणारा आहे. जे दोन्ही तरुण ज्या भागांमध्ये सापडले तो परिसर प्रशासनाकडून बंद करण्यात आला असून घरात सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. धारावीमध्ये  आतापर्यंत 9 रुग्ण आढळले आहे. मुंबईत आतापर्यंत 590 रुणांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या मंगळवारपर्यंत 1018 वर पोहोचली होती.

हे वाचा-BMC चा मोठा निर्णय, मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रात भाजी विकण्यास निर्बंध

संपादन- क्रांती कानेटकर.

First published: April 8, 2020, 10:46 AM IST

ताज्या बातम्या