मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणातील आणखी 2 आरोपींची जामिनावर सुटका

मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणातील आणखी 2 आरोपींची जामिनावर सुटका

सुधाकर द्विवेदी उर्फ स्वामी दयानंद पांडे आणि सुधाकर चतुर्वेदी यांना ५ लाखांचा जामिनदार यावर जामीन दिलाय.

  • Share this:

 विवेक कुलकर्णी, मुंबई

19 सप्टेंबर : मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या आणखी दोन आरोपींना जामीन देण्यात आलाय. मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने हा जामीन दिलाय. सुधाकर द्विवेदी उर्फ स्वामी दयानंद पांडे आणि सुधाकर चतुर्वेदी यांना ५ लाखांचा जामिनदार यावर जामीन दिलाय.

याऐवजी ५ लाख रुपयांच्या रोख व्यक्तीगत जातमुचलक्यावर जामीन द्यावा अशी मागणी आरोपींतर्फे न्यायालयात करण्यात आलीये. गेल्याच महिन्यात २१ आॅगस्टला कर्नल प्रसाद पुरोहीत यांना जामीन देण्यात आला होता. त्यानंतर आता सुधाकर चतुर्वेदी आणि स्वामी दयानंद पांडे यांना जामीन दिला गेलाय. याआधी साध्वी प्रज्ञा सिंह, श्याम साहू, शिवनारायण कालसंग्रा, कर्नल प्रसाद पुरोहित, अजय राहीरकर, जगदीश म्हात्रे, प्रविण टकलकी या ७ जणांना जामिनावर सोडण्यात आलाय.

तर, रमेश उपाध्य, समीर कुलकर्णी आणि राकेश धावडे यांना अजून जामीन मिळालेला नाहीये.

आरोपी सुधाकर चतुर्वेदीवरील आरोप

- याच्या आरडीएक्स सापडले होते

- हा कर्नल प्रसाद पुरोहीत यांचा खबरी होता

- कटात सहभागी होता

स्वामी दयानंद पांडे वरील आरोप

- कटात मुख्य सहभाग

- बाॅम्ब कसे बनवायचे याबाबतच्या फोनवरील रेकाॅर्डींग पांडे कडे सापडल्या होत्या

First published: September 19, 2017, 4:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading