ओव्हरडोसमुळे दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या मृत्यू? संतप्त नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण

ओव्हरडोसमुळे दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या मृत्यू? संतप्त नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण

मुलाच्या नातेवाईकानी डॉक्टरवर निष्काळजीपणाचा आरोप करत त्यांना मारहाण केली आहे.

  • Share this:

प्रदीप भणगे,(प्रतिनिधी)

कल्याण,23 डिसेंबर: खोकला आणि सर्दीने त्रस्त दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या मृत्यूची घटना घडली आहे. मुलाच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर निष्काळजीपणाचा आरोप करत त्यांना मारहाण केली आहे. श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये घडलेल्या या घटनेचा पोलिस तपास करत आहेत. हॉस्पिटल प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले आहेत.

कल्याण शहरातील मोहने परिसरात राहणारे नोमान काजी यांचा दोन महिन्याचा मुलाला सर्दी-खोकला आणि कफचा त्रास झाल्याने सोमवारी सकाळी मुलगा शहझीन याला घेऊन कुटुंबीय कल्याण येथील श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये आले होते. मुलाची परिस्थिती बघून डॉक्टरांनी त्याला औषध दिले. मुलाला परत घरी नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. मुलाला ओव्हरडोस दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. संतप्त नातेवाईकांनी श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला मारहाण केली. डॉक्टरवर कारवाईची मागणी केली जात आहे.

या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणे आहे की, डॉक्टर मुलाच्या नातेवाईकांना मुलाची परिस्थिती पाहून मुलाला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याचा सल्ला दिला होता. त्यासाठी नातेवाईक तयार नव्हते. डॉक्टरांनी मुलाला माफटेल maftel p हे औषध दिले. डॉक्टरने कोणत्याही प्रकारचे निष्काळजीपणा केलेला नाही, असे हॉस्पिटल प्रबंधक बालाजी शेट्टी यांनी सांगितले. या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी दोन्ही बाजूच्या तक्रारी नोंद केल्या असून मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात येणार आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

मुलाच्या तोंडात फुटला सुतळी बॉम्ब..

दुसरी घटना परळी येथील आहे. रेल्वे स्टेशनवर चक्क मुलाच्या तोंडात सुतळी बॉम्ब फुटल्याची घटना घडली आहे. पूर्णा-हैदराबाद पॅसेंजरमध्ये दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गाडीत मोठा आवाज झाल्यामुळे रेल्वे पोलिसांची चांगली भंबेरी उडाली.

मिळालेली माहिती अशी की, हैदराबादकडे जाणारी पूर्णा पॅसेंजर दुपारी 12 वाजता प्लॅटफॉर्मवर आली होती. गाडीचे इंजिन बदलण्याचे काम सुरू असताना एका डब्यात अचानक मोठा आवाज झाला. एका प्रवाशी मुलाच्या तोंडात चक्क सुतळी बॉम्ब फुटला. सय्यद आक्रम (वय 19 रा.पाथरी, जिल्हा परभणी) असे जखमी प्रवाशी तरुणाचे नाव आहे. तो गंभीर जखमी आहे. जखमी मुलाला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मुलाने आपल्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेऊन त्याची वात पेटवल्याचे समजते. या घटनेने रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच रेल्वे सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2019 04:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading