Home /News /mumbai /

मनपा निवडणुकीपूर्वीच मनसेला खिंडार, दोन माजी नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश

मनपा निवडणुकीपूर्वीच मनसेला खिंडार, दोन माजी नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC)निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) मोठी खिंडार पडल्याची बातमी समोर आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील दोन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत.

  ठाणे, 6 मे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC)निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) मोठी खिंडार पडल्याची बातमी समोर आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील दोन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत. गजानन पाटील आणि पूजा पाटील, अशी या दोन माजी नगरसेवकांची नावे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित प्रवेश -  गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंचा (MNS Chief Raj Thackeray) मनसे हा पक्ष राज्यात चर्चेत आहे. त्यातच आता मनसेला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी खिंडार पडल्याचे समोर आले आहे. कल्याण-डोंबिवली मनपातील दोन माजी नगरसेवक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गजानन पाटील आणि पूजा पाटील, अशी या दोन नगरसेवकांची नावे आहेत. ते कल्याण ग्रामीण मतदार संघातील आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश होणार आहेत. हेही वाचा - राणा दाम्पत्याविरोधात 'तो' गुन्हा दाखल करणं भोवलं; मुंबई सत्र न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं
  तर दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरू...
  मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे 4 तारखेला ठिकठिकाणी मनसैनिकांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरू केलं होतं. पण, मुंबई पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले असता मनसेचे नेते संदीप देशपांडे (sandep deshpande) कारमधून पळून गेले होते. यावेळी कारचा धक्का लागल्यामुळे महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली. या प्रकरणी संदीप देशपांडेवर दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणी अपडेट समोर आली आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पळून जाताना वापरण्यात आलेली इनोव्हा गाडी ज्या ड्रायव्हरने चालवली होती त्याला अटक करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राज्यभरात पोलिसांनी आधीच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली होती. मुंबईतही अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी गेले होते. पण, संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे कारमधून बसून पळून गेले.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Maharashtra politics, MNS, Raj Thackeray

  पुढील बातम्या