S M L

सुशांत माळवदेला मारहाण करणाऱ्या दोन फेरीवाल्यांना अटक

या दोघांनाही मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाईंदरमधून पकडलं. त्यांचा जबाब नोंदवला आणि त्यानंतर त्यांना पोलिसांच्या हवाली केलं.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 31, 2017 11:23 AM IST

सुशांत माळवदेला मारहाण करणाऱ्या दोन फेरीवाल्यांना अटक

मुंबई, 31 ऑक्टोबर: मनसे नेता सुशांत माळवदे मारहाण प्रकरणी, मारहाण करणाऱ्या दोन फेरिवाल्यांना मनसे कार्यकर्त्यांनी पकडून दिलं. हे दोन्ही आरोपी भाईंदर इथं लपून बसले होते.

या दोघांनाही मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाईंदरमधून पकडलं. त्यांचा जबाब नोंदवला आणि त्यानंतर त्यांना पोलिसांच्या हवाली केलं. धक्कादायक गोष्ट अशी की हे आरोपी मनसेला सापडू शकतात तर पोलीस एवढे दिवस काय करत होते असा प्रश्न मनसे किंवा कोणत्या पक्षाचा नाहीय. पण एका नागरिकाला जमावाकडून जीवघेणी मारहाण झाली असेल तर त्याला लवकरात लवकर पकडणं पोलिसांचं काम नाही का असा संतप्त सवाल नागरिक विचारतायेत.

काही दिवसांपूर्वी सुशांत मळवदे या मनसैनिकाला फेरीवाल्यांनी मारहाण केली होती. या घटनेवर सगळीकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2017 11:03 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close