News18 Lokmat

डोंबिवली दोन मैत्रिणींची एकाच फॅनला गळफास लावून आत्महत्या

डोंबिवलीजवळच्या कोळेगावात आज सकाळी ही घटना घडली.

News18 Lokmat | Updated On: Nov 27, 2018 10:58 PM IST

डोंबिवली दोन मैत्रिणींची एकाच फॅनला गळफास लावून आत्महत्याप्रदीप भणगे, प्रतिनिधी


डोंबिवली, 27 नोव्हेंबर : डोंबिवलीमध्ये दोन मैत्रिणींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे दोन्हीही मैत्रिणींनी एकाच फॅनला गळफास लावून जीवनयात्रा संपवली. ऋतुजा कोल्हे आणि वर्षा पाटील असं आत्महत्या करणाऱ्या मैत्रिणींची नावं आहे. डोंबिवलीजवळच्या कोळेगावात आज सकाळी ही घटना घडली. घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Loading...


ऋतुजा साहेबराव कोल्हे (14) आणि वर्षा चिंतामण पाटील (27) असे आत्महत्या करणाऱ्या मैत्रिणींची नावे आहे.

बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या कोळेगावात श्री समर्थकृपा इमारतीत चिंतामण पाटील राहतात. त्यांची मुलगी वर्षा हिच्याकडे ऋतुजा ही नेहमी झोपायला येत असते. नेहमीप्रमाणे ऋतुजा आणि तिचा भाऊ सोमवारी रात्री वर्षाच्या घरी झोपले. पहाटे पाच वाजता ऋतुजाच्या भावाला जाग आली.


तेव्हा स्वयंपाकघरातील सिलिंग फॅनला ऋतुजा आणि वर्षा या दोघींचा मृतदेह एकाच ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत लटकताना आढळून आला.


या दोन्ही मैत्रिणींनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप कळू शकलं नाही. मानपाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 03:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...