दोन दिवसात 15 हजार बीएस-3 गाड्या विक्री

दोन दिवसात 15 हजार बीएस-3 गाड्या विक्री

गेल्या दोन दिवसात जवळपास राज्यात 15 हजारापेक्षा जास्त दुचाकी आणि चार चाकी वाहनांची विक्रमी विक्री झालीय

  • Share this:

01 एप्रिल : बीएस-3 गाड्यांवर सुप्रीम कोर्टाने बंदी घातल्यानंतर गेल्या दोन दिवसांत बंपर विक्री झालीये. दोन दिवसात 15 हजार बीएस थ्री गाड्यांची विक्री झाल्याची नोंद झालीये.

दोन दिवसाच्या बंपर सूटनंतर आता त्या गाड्यांमधून बंपर प्रदूषण होणार नाही का असा सवाल सोशल मीडियावर विचारला जाऊ लागलाय. एवढंच नाही तर अशा प्रदूषणकारी गाड्या भंगारात न काढता त्यांचा नोटाबंदीसारखा निकाल का लावला अशीही जोरदार चर्चा रंगलीय.

ह्या चर्चेला कारण आहे ते गेल्या दोन दिवसात जवळपास राज्यात 15 हजारापेक्षा जास्त दुचाकी आणि चार चाकी वाहनांची विक्रमी विक्री झालीय. ह्या सगळ्या गाड्यांमध्ये बीएस थ्री इंजिन आहे आणि ह्या गाड्यांवर प्रदूषणकारी म्हणून सुप्रीम कोर्टाने बंदी आणलीय. अगोदरच शहरं प्रदूषणाच्या विळख्यात असताना या गाड्यांमुळे त्यात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जातेय.

50 हजारपेक्षा जास्त गाड्यांची विक्री

राज्यात जवळपास 5 पट वाहनांची विक्री, एकट्या मुंबईत 400 टक्क्यानं वाढ

मुंबईत रोज 250 बाईक्सची नोंद होते

मात्र काल रात्री 9 पर्यंत बाईक्सची 1288 बाईक्सची नोंद

मुंबईत रोज 100 कारची नोंदणी होते

काल 250 कारची नोंद, 173 टक्के वाढ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2017 01:03 PM IST

ताज्या बातम्या