खड्ड्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

खड्ड्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुलं पाण्यात पडलीत हे कळताच आजुबाजूच्या लोकांनी त्यांना बाहेर काढलं. पण त्यांना वाचविण्यात यश आलं नाही.

  • Share this:

कल्याण 8 जुलै : बल्याणी परिसरातील धक्कादायक घटना घटलीय. पावसामुळं एका खोल खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. मयंक सुनील शर्मा (वय 11) आणि पीयूष पवन पाठक (वय 11) अशी दोन मुलांची नावं आहेत. काही कामासाठी खोदकाम करण्यात आलं होतं. त्याचा मोठा खड्डा तयार झाला होता. त्यात पाणी साचलं होतं. ही मुळं खेळत असताना त्या खड्ड्यात पडली. पाणी खोल असल्याने त्यांच्या नाका-तोंडात पाणी गेलं होतं. लोकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही.

मुलं पाण्यात पडलीत हे कळताच आजुबाजूच्या लोकांनी त्यांना बाहेर काढलं. त्यावेळी त्यांच्या पोटात पाण्यात गेलं होतं. पाणी चिखलयुक्त असल्याने मुलांचा श्वास कोंडला गेला आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. लोकांनी त्यांच्या पोटातलं पाणी काढून वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही.

SPECIAL REPORT : राणेंवर का आली 'दादा माझ्या मुलाला वाचवा' म्हणण्याची वेळ?

मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई आणि आसपासच्या परिसरात येत्या 24 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात येत आहे.हवामान विभागाने पुढच्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तो लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनीही नागरिकांना काळजी घेण्याबाबत आवाहन केलं आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात केलेल्या ट्वीटरमध्ये म्हटलं आहे की, "पुढच्या 24 तासांत अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट, नव्या समीकरणांचे संकेत

या काळात 200 मिमी एवढा पाऊस पडू शकतो. त्यामुळे सुरक्षित राहा."

मुंबई आणि उपनगरांमध्ये आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. याचा लोकल सेवेवरही परिणाम झाल्याचं दिसून आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: heavy Rain
First Published: Jul 8, 2019 08:36 PM IST

ताज्या बातम्या