दोन भावांना विवस्त्र करून गुप्तांगाची केली छेडछाड, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

दोघांना एका टोळक्याने वाटेत अडवून त्यांच्यावर मच्छी चोरल्याचा खोटा आरोप करून त्यांना विवस्त्र करून चिंचेच्या झाडाला बांधून त्यांचा अमानुष छळ केला.

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2019 06:14 PM IST

दोन भावांना विवस्त्र करून गुप्तांगाची केली छेडछाड, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

रवी शिंदे,(प्रतिनिधी)

भिवंडी,31 ऑक्टोबर: स्विमिंग पुलमधील मच्छी चोरल्याचा आरोप करत दोन भावांना विवस्त्र करून गुप्तांगाची छेडछाड केली. नंतर चिंचेच्या झाडाला बांधून त्यांचा अमानुष छळ केल्याची घटना तब्बल सहा महिन्यांनी  समोर आली आहे. पीडित मुले शहरातील टावरे स्टेडियम येथील स्विमिंग पुलमधून अंघोळ करून घरी जात होते. दोघांना एका टोळक्याने वाटेत अडवून त्यांच्यावर मच्छी चोरल्याचा खोटा आरोप करून त्यांना विवस्त्र करून चिंचेच्या झाडाला बांधून त्यांचा अमानुष छळ केला. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळून पोलीस कोठडीत डांबले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित शहरातील टावरे स्टेडियम येथील स्विमिंग पूलमध्ये 18 एप्रिल 2019 रोजी पोहोण्यासाठी गेले होते. पोहून झाल्यानंतर दिवानशाह दर्गा येथून घरी जात असताना अस्लम हसन रजा अन्सारी (23 ) याने या दोन्ही भावांना जबरदस्तीने चिंचेच्या झाडाखाली घेऊन गेला. त्यानंतर या ठिकाणी नाजीम फारुकी (32) हा येऊन तलावात मच्छी पकडण्यास मनाई आहे, असे तुम्हाला वारंवार सांगितले आहे. तरी तुम्ही मच्छी पकडता, असा खोटा आरोप केला. यावेळी या ठिकाणी हाफिज मुसाफ अंसारी (17) व आलीम (24) हे देखील उपस्थित होते. यावेळी अस्लम, नाजीम, हाफिज व आलीम या चौघांनी फिर्यादी व फिर्यादीच्या भावाच्या अंगावरील कपडे काढून भावाच्या गुप्तांगाची छेडछाड केली. त्यानंतर एका प्लास्टिकच्या बाटलीत साप आणून हा साप अंगावर सोडून झालेल्या प्रकाराची मोबाइलवर शूटिंग करून व्हिडिओ 29 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे मानसिक ताण वाढल्याने या दोन्ही भावांनी थेट भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्यावर सहा महिन्यांपूर्वी गुदरलेला प्रसंग पोलिसांना कथन केला. त्यामुळे भोईवाडा पोलोसांनी या अमानुष घटनेप्रकप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करून या चारही जणांना अटक केली आहे. यातील अस्लम, नाजीम, आलीम या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर हाफिज याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक टी.जी.जोशी करीत आहेत.

VIDEO : परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 06:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...